– आरोग्य तपासणी शिबिरात शेकडो महिला-पुरूषांनी घेतला मोफत उपचार!
चिखली (रंजना मोरे) – जनसामान्यांच्या आरोग्य सेवेसाठी मेरा बुद्रूक येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी दिली. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आ.श्वेताताई महाले यांच्या संकल्पनेतून शिव जयंती उत्सव समितीच्यावतीने मेरा बुद्रूक येथे आज, दि.१४ मेरोजी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आ. श्वेताताई बोलत होत्या. मेरासह परिसरातील गावांतील महिला व पुरूषांनी मोठ्या संख्येने या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक हे गाव आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे माहेर आहे. त्यामुळे गावकरी प्रत्येक महामानवांच्या जयंत्या असो की इतर कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम असोत, त्यासाठी आ. श्वेताताईंना आवर्जुन बोलावतात व त्यादेखील आवर्जुन उपस्थित राहतात. यावर्षी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचे निमित्य साधून व आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या संकल्पनेतून गावकर्यासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उदघाटनप्रसंगी मंचावर आ. श्वेताताई महाले पाटील, सरपंच अनिताताई वायाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ, अंकुशराव पाटील, उपसरपंच दिनकरराव डोंगरदिवे, तालुका आरोग्य अधिकारी कणखर, पोलिस पाटील दत्तू पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पाटील, राधेश्याम पाटील, माजी सरपंच अर्चना पडघान, पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रताप मोरे, माजी पंचायत समिती सदस्य अमोल पाटील, माजी सरपंच बाळू खेडेकर, हभप विजू पाटील, माजी सरपंच राजेंद्र पाटील, सुनील पाटील, ग्रामपंचायत सदस्य सागर पडघान, के के पडघान, भारत पडघान, माजी सैनिक भास्कर पाटील, रमेश तेटवर आदींची उपस्थिती होती. या शिबिरातजिल्हा, तालुका आरोग्य अधिकारी, अंत्री खेडेकर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ठाकरे मॅडम, डॉ.लहाने, औषध वैद्यकशास्त्र डॉ. अमित अरसोडे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आकांशा अरसोडे, बालरोगतज्ज्ञ डॉ.पवन अखाडे, अस्थिव्यांगोपचार तज्ज्ञ पवन राऊत, त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. बालाजी आदरट, दंतरोगतज्ज्ञ डॉ. पूनम वानखेडे मॅडम, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.निकम, डॉ.विशाल सावळे, डॉ.वायाळ, सर्व तालुक्याचे सीएचओ व मेडिकल ऑफिसर असे आजारांचे नामवंत विशेषज्ञ डॉक्टर्स यांनी शिबिरात येणार्या शेकडो नागरिकांची मोफत तपासणी व उपचार करुन मार्गदर्शन केले. यावेळी शिव छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे मोहन पडघान व सर्व सदस्य आणि आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.लहाने, डॉ.गाताडे मॅडम, आरोग्य सुपरवायझर चव्हाण मॅडम, आरोग्य सेवक, सेविका, आशा सेविका तथा आदी कर्मचार्यांनी सर्वतोपरी परिश्रम घेतले. यावेळी गावातील मोठ्या संख्येने महिला पुरुष व तरुण मुले, मुली यांनी उपस्थिती दाखविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निवेदक सुधीर पाटील तर आभार निखिल पाटील यांनी मानले.