– अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत एमडी मेडिसिन पदवी संपादन; जांभोर्याच्या मातीचा अभिमान वाढविला!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज पार पडलेल्या पदवीप्रदान समारंभात जांभोरा (ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) येथील डॉक्टर कैलास अशोक गाडेकर यांना एमडी मेडिसिन ही पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ. कैलास हे शेतकरी अशोक लक्ष्मण गाडेकर व त्यांच्या पत्नीचे चिरंजीव असून, एकदम साध्या कुटुंबातून आलेले आहेत. आर्थिक अडचणी, मर्यादित शैक्षणिक सुविधा आणि हलाखीची परिस्थिती यांचा सामना करत त्यांनी हे यश संपादन केले. आपल्या जीद्द, चिकाटी आणि कष्टावर विश्वास ठेवून डॉक्टर कैलास यांनी हे सिद्ध केले, की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी प्रयत्नांनी यश नक्की मिळते. त्यांच्या यशामुळे जांभोरा गावात आनंदाचे वातावरण असून, ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. त्यांनी ग्रामीण भागातील युवकांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. ‘परिस्थितीवर मात करून यश मिळवायचे असेल, तर आत्मविश्वास, कष्ट आणि जीद्द गरजेची असते,’ असे डॉक्टर कैलास म्हणाले.