बुलडाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र) – पोलिसांशी हुज्जत घालणे त्यांच्यावर हल्ला करणे, असे प्रकार सहसा उत्तर प्रदेश व बिहार मध्ये घडतात. परंतु युपी मध्ये योगीजी मुख्यमंत्री झाल्यापासून गुंडाराज मोडीत काढीत विकास दुबेचा खात्मा करण्यात आला. महाराष्ट्रला संताची भूमी म्हणून ओळखली जाते, असे असतांना चांडोळ येथील अवैध धंद्याबाबत जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासने कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्याने तसेच चांडोळ येथे सर्रास अवैधधंदे चालू असतांना फक्त नागपंचमीच्या सणाला पत्ते खेळणाऱ्यांवर धाड टाकून पोलिस कारवाई होत असल्याने, संतप्त गावकऱ्यांनी चांगलेच वेठीस धरल्याने पोलिसांवर धूम ठोकून पळून जाण्याची वेळ आल्याची घटना बुलडाणा तालुक्यातील चांडोळ येथे 1 ऑगस्टच्या रात्री 9.30 ते 10 वाजेच्या दरम्यान घडल्याची जोरदार चर्चा जिल्हाभर रंगली आहे.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला मिळालेल्या माहितीनुसार, धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चांडोळ येथील बस स्टॅण्डवर 1 ऑगस्टच्या रात्री 9 वाजेच्या सुमारास धाड पोलीस स्टेशनला स्टेशन डायरीला नोंद घेऊन आठ कर्मचारी व एक अधिकारी चांडोळ येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकली. मात्र धाड करताना गावकरी व गावातील काही नागरिक जमा होत होत बराच मोठा लोकांचा माहोल तयार झाला. पोलिस आणि गावकरी यांच्यात झटापट होऊन मुद्देमाल व धाड पोलीस स्टेशनला परतले. यावेळी एका पोलिस कर्मचाऱ्याला अज्ञातांनी धक्काबुक्की केली. तर एक अधिकाऱ्याला मोटर सायकलवर बसून पोलिस स्टेशनला गेल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.
चांडोळ येथील स्थानिक बसस्टॅंड परिसरात असलेल्या एका दूध डेअरीमध्ये पैशाच्या हारजितवर एक्काबादशहा नावाचा जुगार खेळल्या व खेळविल्या जात असल्याची गुप्त माहिती १ ऑगस्ट रोजी धाड पोलिसांनी मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सीव्हील ड्रेसमध्ये असलेल्या पोलिसांच्या एका पथकाने रात्री १० वाजता उपरोक्त ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी १० ते १२ जण पैशाच्या हारजितवर एक्काबादशहा जुगार खेळतांना रंगेहात मिळून आले. त्यांना पोलिस व्हॅनमध्ये बसवित असतांना धावत आलेल्या शंभर-सव्वासे नागरिकांच्या टोळक्याने पकडलेल्या लोकांना नेतांना पोलिसांना मज्जाव करीत ‘आरोपींना हात लावाल तर याद रखा’ हप्ते घेवून वरली-मटका, एक्का बादशहा जुगार, अवैध दारु विक्री, गुटखा विक्रीच्या धंद्यांना प्रोत्साहन देता आणि उत्सवाच्या एक दिवस खेळणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखविता, असे म्हणून पोलिसांना लोटपाट करुन जप्त केलेला मुद्देमाल सोडून पोलिसांनी धूम ठोकल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी मात्र आपली बाजु सुरक्षित ठेवण्यासाठी धाड स्टेशन डायरीला परात येण्याची फक्त नोद घेतली. चांडोळ गावातून कानोसा घेतला ऑगस्टच्या रात्री घडलेल्या त्या प्रकाराची गावभर जोरदार चर्चा सुरु आहे. तर आज सर्वत्र खुलेआम चालणारे अवैध धंदे मात्र बंद होते, हे विशेष! चांडोळ येथील या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. घटनास्थळी काय घडले हे मात्र गुलदस्त्यातच आहे. हे प्रकरण नेमके कश्यामुळे घडले, याची पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करुन सत्य काढणे गरजेचे आहे.
चांडोळ ग्रा.पं.चे निवेदन पोलिस प्रशासनाकडून बेदखल..
बुलडाणा तालुक्यातील धाड येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गावात अवैध धंदे बोकाळले आहेत, अवैध गुटखा तस्करी, देशीदारुची खुलेआम तस्करी, गावठी दारु, रेती तस्करी, जुगार, वरळीमटका, चक्री यासह असंख्य बेकायदा धंदे तसेच गावागावात देशीदारुची दुकाने थाटल्याने महिलांची मोठी कुंचबना होते, अवैध धंद्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो, असे निवेदन मुख्यमंत्री, जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्यासह डझनभर अधिकाऱ्यांना 22 जुलै रेाजी चांडोळ ग्रामपंचायत कार्यालयाच्या लेटर हेडवर सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आले होते.
प्रकरण कश्यामुळे घडले याची चौकशी होईल का?
धाड येथे राजरोसपणे सर्व प्रकारचे अवैध धंद्यांना मोठा ऊत आला आहे. त्या अवैध धंदे खुलेआम सुरु असतांना नागपंचमी उत्सवाच्या एक दिवस खेळणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखविता, त्यांच्यावर कारवाई का करता? असे म्हणत पोलिसांना लोट-पोट व धक्का-बुक्की करीत आम्ही दिलेल्या निवेदनाचे काय?, असा संतप्त सवाल करीत आधी गावातील अवैध धंदे बंद करा, नंतरच या आरोपींवर कारवाई करा, असे म्हणत आरोपींना घेवून जाण्यास गावकऱ्यांनी विरोध केला. प्रकरण वेगळेच वळण घेत असल्याचे पाहून पोलिसांनी आरोपींना सोडून देत पोलिसांना घटनास्थळावरुन धूम ठोकलने पुढील अनर्थ टळला. परंतु सदर प्रकार कश्यामुळे घडला, जर गावातील सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य यांनी पोलिस प्रशासनाला निेवेदनाद्वारे चांडोळ येथील अवैध धंद्याबाबत अवगत केले होते, हे विशेष!
ठाणेदार म्हणतात जुगारी पळून गेले..
पोलिस गस्तीवर असतांना 1 ऑगस्टच्या रात्री चांडोळ मध्ये एका ठिकाणी जुगार सुरु असताना धाव घेतली, दरम्यान पोलिस प्रशासनाचा सुगावा लागल्याने जुगारी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे, असे धाड ठाणेदार अनिल पाटील यांनी प्रिंट मिडीयाशी बोलतांना सांगितले.