मेरा बु , ता. चिखली (प्रताप माेरे) : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गावातील नाल्यामधून सांडपाणी वाहत गावाबाहेर जात असल्यामुळे ठिकठिकाणी घाणपण्याच्या गटाराचे साम्राज्य पसरलेले असते आणि या साचलेल्या गटाराच्या दुर्गंधीमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे सरपंच दिपक केदार यांनी गावातील मुख्य रस्त्यावरील नाल्यामध्ये पीव्हीसी पाईप टाकून गाव दुर्गंधीमुक्त केले .
चिखली तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या गुंजाळा गावाची लोकसंख्या दोन हजाराच्या वरती असून सरपंच पद हे जनतेमधून आहे . त्यामुळे सात सदस्य व एक सरपंच असे एकूण आठ सदस्य कार्यरत आहेत तर ग्रामसेवक पदावर धनवे हे कामकाज पाहतात . सरपंच दिपक केदार यांनी पदभार हाती घेताच गावात एक कोटींचा वरती विकास निधी आणून गल्लोगल्लीत सिमेंट रस्ते , ६५ लाख रुपयांची पाईप लाईन योजना , समशान भूमी , बुध्द विहार , डॉ बाबासाहेब आंबेडकर सभामंडप , पांदण रस्ते , शेत रस्ते , भीषण पाणीटंचाईवर मात , ग्रामपंचायत भवन , अंगणवाडी शाळा , जि.प. शाळेचे सुशोभिकरण आदी एक कोटींचा वरती विकास कामे केली.
एवढ्यावरच न थाबता गाव रोगमुक्त करण्यासाठी मुख्य रस्त्यावरील नाल्यामध्ये पीव्हीसी पाईप टाकून घाण पाण्याची विल्हेवाट लावली. गेल्या कित्येक वर्षांपासून गुंजाळा गाव विकासापासून कोसो दूर होते अगोदरच्या लोकप्रतिनिधी यांनी ग्रा.प. च्या खात्यात आलेला निधीच खर्च केला. त्यामुळे पाहिजे तशी कामे करता आली नाही मात्र सरपंच दिपक केदार यांनी पालकमंत्री डॉ शिगणे , जि.प सदस्य सौ ज्योतीताई अशोकराव पडघान , प.स. सदस्य सौ जुलेखाबी सत्तार पटेल , पाणी पुरवठा विभाग , जि.प. बांधकाम विभाग आदी अधिकारी पदाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करुन कोटींचा वरती विकास निधी गावात आणला . यासाठी सरपंच यांना ग्रा.प.उपसरपंच सुनील केदार , तथा सर्व सदस्य यांच्या सहकार्याने गावातील दुर्गंधी दूर करण्यात यश आले. त्यामुळे ग्रा.प.च्या कामामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे .