– नाव्हा – सिंदखेडराजा रोडवरील दुपारची भीषण दुर्घटना; जखमींवर जालना व सिंदखेडराजा येथे उपचार सुरू!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – दारूच्या नशेत असलेल्या आयशर ट्रकच्या वाहनचालकाने आपले वाहन निष्काळजीपणे व भरधाव चालवून जालना ते सिंदखेडराजा रोडवर नाव्हानजीक एसटी बसला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एसटी बसमधील दोन प्रवासी जागीच, तर दोन प्रवासी उपचारादरम्यान ठार झाले असून, बसमधील 24 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच जालना व सिंदखेडराजा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत व बचावकार्य केले. तसेच, जखमींना तातडीने जालना व सिंदखेडराजा येथील रूग्णालयात हलवले आहे. एसटी बसही छत्रपती संभाजीनगरहून माहूरगडला जात होती. अपघातात दोन्हीही वाहने चक्काचूर झाली आहेत.
जालना ते सिंदखेडराजा रोडवरील नाव्हा येथे एसटी महामंडळाच्या मालेगाव ते माहूरगड या बसला हा अपघात झाला. आयशर ट्रक आणि ही बस समोरासमोर धडकली. आज (दि.१४) दुपारच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता, की या अपघातामध्ये एसटी बसमधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर जवळपास 26 प्रवासी जखमी झाले, त्यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात बसचा वाहक गंभीर जखमी झाला असून, बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघातग्रस्त एसटी बस जालन्याकडून बुलढाण्याच्या दिशेने जात होती. तर आयशर ट्रक हा सिंदखेडराजावरून जालनाच्या दिशेने येत होता. अपघाताची माहिती मिळताच जालना व सिंदखेडराजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ नजीकच्या शासकीय रूग्णालयामध्ये दाखल केले. तर गंभीर जखमींना जालना येथे हलविण्यात आले होते.
बस (एमएच १४ बीटी ४२७६) मालेगावहून जालनामार्गे माहूरगड येथे जात होती. चालक व वाहकासह ७० प्रवासी यातून प्रवास करत होते. वैभव शेरकर (२२, सिंदखेडराजा), पुरुषोत्तम बाहेकर (६०, मेहकर) व विष्णू कांगणे (६२ कुंबेफळ, सिंदखेडराजा, सर्व जि. बुलडाणा), माेहन राठोड (६५ रा. मेहकर) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की जखमींना बसमधून बाहेर काढण्यासाठी तब्बल अर्धा-ते पाऊण तास लागला. यामुळे रस्त्याच्या तर्फा ४ किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. आयशरचालक पसार झाला. बसचालकही गंभीर जखमी झालेला होता.
दरम्यान, आयशर ट्रकचा चालक हा आपले वाहन भरधाव चालवत होता. तसेच, तो दारूपिऊन वाहन चालवित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त बस छत्रपती संभाजीनगरहून माहूरगडकडे जात होती. तर, आयशर ट्रक हा सिंदखेडराजावरून जालनाच्या दिशेने जात होता. या अपघातात एसटी महामंडळाच्या बसचा समोरील भागाचा अक्षरश: चेंदामेदा झाला. जखमींना जवळच्या रूग्णालयात तसेच काहींना जालना येथे हलविण्यात आले असून, अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
बस अपघातात मेहकर व सिंदखेडराजा तालुक्यांतील चौघांवर काळाचा घाला!