Head linesMEHAKARVidharbha

शेतकर्‍यांची चेष्टा थांबवा, अन्यथा पीकविमा कंपनीला गंभीर परिणाम भोगावे लागतील : ऋषांक चव्हाण, डॉ. ज्ञानेश्वर टाले यांचा इशारा

- सोनाटी येथे शेतकरी मेळावा; डॉ. ऋतुजा चव्हाण यांना मतदारसंघातून भरघोस पाठिंबा

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – पीकविमा कंपनीने शेतकर्‍यांची दिशाभूल करु नये. आता शेतकर्‍यांची चेष्टा थांबवावी, अन्यथा विमा कंपनीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा शेतकरी नेते ऋषांक चव्हाण व डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी पीकविमा कंपनीला दिला आहे. याप्रसंगी शेतकरी नेते  डॉ. ज्ञानेश्वर टाले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सोनाटी गावातील शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेत असताना ते शेतकर्‍यांशी संवाद साधताना बोलत होते. त्यांच्या पत्नी डॉ. ऋतुजा चव्हाण या मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविणार असून, त्यांना मतदारसंघातून जोरदार पाठिंबा मिळत आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर व डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या मार्गदर्शनखाली मेहकर मतदारसंघातील सोनाटी येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ऋषांक चव्हाण म्हणाले, की नैसर्गिक आपत्तीत शेतातील उभ्या पिकांची माती झाली आहे. तरीही शेतकर्‍यांना नुकसान भरपाईचा पीकविमा देण्यास पीकविमा कंपन्या टाळाटाळ करीत आहेत. आजही बहुतांश शेतकर्‍यांच्या बँक खात्यात विमा कंपनीकडून पीकविमा आलेला नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे व पूर्णपणे कोलमडून पडलेला आहे. अशा अवस्थेत पीकविमा कंपनीकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. पीकविमा कंपनी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. यामुळे शेतकरी पीकपिक विम्यापासून वंचित आहे. विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांची चेष्टा आतातरी थांबवावी, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरला तर विमा कंपनीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा निर्वाणीचा इशारा ऋषांक चव्हाण यांनी सोनाटी येथे दिला आहे.गेल्या खरीप हंगामात पावसामुळे पिकांची नासाडी झाली. अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली, तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर शेतकरीनेते रविकांत तुपकर यांनी पीकविमा कंपनीच्या विरोधात महाराष्ट्रभर रान पेटविले होते. शेतकर्‍यांच्या हितासाठी लढा उभारला होता. त्यामुळे पीकविमा कंपनीकडून तात्पुरती काही मोजक्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात विमा रक्कम जमा करण्यात आली. मात्र आजही मेहकर मतदारसंघातील अनेक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात विमा रक्कम जमा करण्यात आली नाही. त्यामुळे विमा कंपनीकडून होत असलेला विलंब शेतकर्‍यांच्यासाठी त्रासदायक आहे. त्यामुळे मतदारसंघातील सोनाटी येथील शेतकरी एकवटले होते. ऋषांक चव्हाण यांनी विमा कंपनीला थेट इशारा देत म्हणालेत की, आता शेतकर्‍यांची चेष्टा थांबवावी अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी ऋषांक चव्हाण यांच्यासह रोशन काबरा, सागर सोळंके, गजानन तिजारे, विनोद काताडे, रवि फुके व शेकडो पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!