Head linesMaharashtraPolitical NewsPolitics

वंचित बहुजन आघाडीकडून आणखी १० उमेदवारांची घोषणा; सर्व मुस्लीम!

- मलकापूरमधून शहजाद खान सलीम खान, बाळापूर खातीब सयद नातीक्वाद्दीन, औरंगाबाद मध्यमधून मोहम्मद जावीद मोहम्मद इसाक यांना उमेदवारी

– वंचित आघाडीकडून आतापर्यंत २१ उमेदवारांच्या नावाची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीने आपल्या आणखी १० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात औरंगाबाद मध्यमधून मोहम्मद जावेद मोहम्मद इसहाक यांना संधी देण्यात आली आहे. तर गंगापूरमधून सय्यद गुलाम नबी सय्यद यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने ११ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यात औरंगाबाद पूर्वचा उमेदवार जाहीर केला होता. यानंतर आता मलकापूर, बाळापूर, परभणी, औरंगाबाद मध्य, कल्याण पश्चिम, हडपसर, माण, शिरोळ, सांगली या जागांचा समावेश आहे. यावेळी जाहीर केलेले सर्व १० उमेदवार मुस्लिम समाजातील आहेत. त्यामुळे एकूण घोषित उमेदवारांची संख्या २१ वर पोहोचली आहे.

वंचित बहुजन आघाडीने दहा जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. यात औरंगाबाद मध्य (छत्रपती संभाजीनगर मध्य), कल्याण पश्चिम, परभणी, हडपसर, मान, सांगली या महत्त्वाच्या मतदारसंघाचाही समावेश आहे. मलकापूर विधानसभा मतदारसंघ – शहजाद खान सलीम खान (मुस्लीम), बाळापूर विधानसभा मतदारसंघ – खातीब सयद नातीक्वाद्दीन (मुस्लीम), परभणी विधानसभा मतदारसंघ – सयद सामी सय साहेबजान (मुस्लीम), औरंगाबाद मध्य मतदारसंघ – मोहम्मद जावीद मोहम्मद इसाक (मुस्लीम), गंगापूर विधानसभा मतदारसंघ – सय्यद गुलाम नबी सय्यद (मुस्लीम), कल्याण पश्चिम मतदारसंघ – अयाज गुलजार मोलवी (मुस्लीम), हडपसर विधानसभा मतदारसंघ – मोहम्म अफरोज मुल्ला (मुस्लीम), मान विधानसभा मतदारसंघ – इम्तियाज जफर नदाफ (मुस्लीम), शिरोळ विधानसभा मतदारसंघ – आरिफ मोहम्मदाली पटेल (मुस्लीम), सांगली विधानसभा मतदारसंघ – अल्लाउद्दीन हयातचंद काझी (मुस्लीम) यांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीवेळी झाला होता. मात्र, सन्मानजनक जागा दिल्या जात नसल्याने वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढवली होती. लोकसभेत चांगली कामगिरी वंचितला करता आली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!