नंदुरबार (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेची स्थायी समितीत तालुक्यातील ठाणेपाडा येथे शासकीय आश्रम शाळेत विहीर मंजूर करून कागदावरच तयार झाल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रत्यक्षात विहीर मात्र तयार केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोय निर्माण होत आहेत. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या विहीरच चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथील आश्रम शाळेला जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून विहिरीतून पाणी देण्याचे प्रस्तावित असताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी विहीर खोदली. परंतु पाणीच लागले नसल्याचा दावा करण्यात आला होता. संबंधित जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे सदस्य देवमन पवार यांनी या सर्व गोष्टींचा उलगडा करत ज्या ठिकाणी विहीरच खोदली नाही. तर पाणी लागणारच कुठून? असा सवाल उपस्थीत केला.
चौकशी करुन कारवाई करा-जि.प.सीईओ
खोटे दाखले आणि चुकीची माहिती सभागृहाला अधिकारी देत असल्याचे देवमन पवार यांनी सांगून, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी पूर्त नामुष्कीला सामोरे जात वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील या गोष्टी अवगत करून सदर अधिकारी हे खोटे बोलून सभागृहात अधिकाऱ्यांची व सदस्यांची दिशाभूल करण्याचा प्रकार उघडकीस आणला आला आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष यांनी याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करावी अशा सूचना दिली आहे.