नंदुरबार (प्रतिनिधी) तळोदा शहरातील कॉलेज चौफुली ते वनविभाग कार्यालय परिसरात पाच ते सहा ठिकाणी चोरट्यांनी दुकाने फोडून दुकानात शिरून रोख रक्कम व साहित्य चोरून नेल्याची घटना आज 25 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. यामुळे व्यापारीवर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर चोरट्यांना पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.
तळोदा शहरात चोरींच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे व्यापारीवर्गासह सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे. तळोदा येथे दुकानात झालेल्या चोरीचा प्रकार जय किसन आग्रो या दुकानात लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात चोरांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. मध्यरात्री दोन चोर रेनकोट घालून फिरत आहेत. लोखंडी रॉडच्या सहाय्याने शटर फोडून दुकानात टॉर्चचा साहाय्याने गल्ले तपासताना दिसत आहे. मास्क परिधान केलेल्या चोरांच्या हालचाली (CCTV) सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून समोर आल्या आहेत. नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून पोलिसांनी शहरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर चोरट्यांना पकडण्याची मागणी व्यापारी संघटनेसह शहर वासीयांकडून होत आहे.
Leave a Reply