बिबी (ऋषी दंदाले) – सिंदखेडराजा तालुक्यातील कुंबेफळ येथे सार्वजनिक स्वच्छतालयाच्या सुमारे साडेतीन लक्ष रूपयांच्या कामाला मंजुरी मिळाली असून, या कामाचे भूमिपूजन आज (दि.२३) सकाळी १० वाजता सरपंचपती राजेश इंगळे यांच्याहस्ते पार पडले. गावात स्वच्छता अभियान राबविण्याची भूमिका त्यांनी याप्रसंगी मांडली.
कुंबेफळ (ता. सिंदखेडराजा) येथे भारत स्वच्छता मिशनअंतर्गत सार्वजनिक शौचालयाच्या कामासासाठी तीन लाख ५० हजार मंजूर झालेले आहेत. आज त्या कामाचे सरपंचपती राजेश इंगळे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितीमध्ये कुंबेफळ येथील उपसरपंच सुधाकर पवार तसेच ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कांगणे, रामेश्वर डोळे, पंढरी फड, पंढरी राठोड, बाळू चव्हाण, समाधान फड, प्रकाश आंधळे व गावातील प्रतिष्ठित नागरिक शरद पवार, सुनील कांगणे, मधुकर इंगळे, प्रल्हाद नागरे व इतर मंडळी उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी सरपंचपती इंगळे यांनी गावांमध्ये जास्तीत जास्त विकासकामे, तसेच गावामध्ये स्वच्छता अभियान राबवण्याचे ठरविले आहे, असे सांगितले. त्यांच्या या कामाबद्दल गावकर्यांनी सरपंचपती राजेश इंगळे यांचे अभिनंदन केले असून, सर्वत्र अभिनंदन होत आहे.
————