आळंदीत शोभा यात्रा, दिंडी मिरवणूक, श्री रामरायांची पालखी लक्षवेधी, पुष्पवृष्टी
आळंदी (अर्जुन मेदनकर) – अयोध्या येथील श्रीराम मंदिरात श्रीराम लल्लांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त तीर्थक्षेत्र आळंदी सह पंचक्रोशीतील विविध मंदिरे, मठ, धर्मशाळा तसेच इंद्रायणी नदी घाटावर विविध लक्षवेधी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात श्रींचे संजीवन समाधी मंदिरात लक्षवेधी शहरात घंटानाद व पुष्पवृष्टी झाली. विविध मंदिर धर्मशाळा इंद्रायणी नदी घाट या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला.
तीर्थक्षेत्र आळंदीतील प्रथा परंपरांचे पालन करीत श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा या निमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात परंपरेने धार्मिक कार्यक्रम तसेच माऊलींचे संजीवन समाधी वर पुष्पवृष्टी, संध्याकाळी माऊली मंदिरासह इंद्रायणी नदी काठा वर दीपोत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. आळंदी पंचक्रोशीतील नागरिकांनी आपापल्या घराच्या बाहेर दीप प्रज्वलित करून रांगोळ्या काढून सोहळ्यात सहभागी झाले. या निमित्त आळंदीतील मंदिर परिसरात विद्युत रोषणाई तसेच आळंदीत फ्तज्यंची आतिषबाजी करण्यात आले. भगवे वादळ या निमित्त आले शहरात भगवे झेंडे घेवून मिरवणूक उत्साहात झाली. सकल हिंदू समाज आळंदी ग्रामस्थ, पंचक्रोशी ग्रामस्थ यांच्या वतीने आळंदीमध्ये उत्साहात शोभायात्रा तसेच हरिनाम गजरात दिंडी मिरवणूक झाली. आळंदी परिसरातील वारकरी शिक्षण संस्था मध्ये शिक्षण घेणाऱ्या साधक वारकरी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दिवसभर हरिनाम गजर करीत नगर प्रदक्षिणा, मंदिर प्रदक्षिणा झाल्या. श्रींचे दर्शनास भाविक नागरिकांनी परिसरातील मंदिरांमध्ये गर्दी केली होती. श्री हजेरी मारुती मंदिरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले. श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेत संस्थेचे उपाध्यक्ष विलासतात्या बालवडकर यांचे तर्फे महाप्रसाद वाटप करण्यात आले. सकल हिंदू समाजाच्या वतीने येथील शोभायात्रा लक्षवेधी झाली. श्रीरामाची मूर्ती, लेझर शो, शालेय विद्यार्थ्यांच्या पथकामध्ये उत्साहात झाली. यावेळी महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. शोभा यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे श्री राम रायाच्या पालखीची मिरवणूक हे खास आकर्षण ठरले. श्री आवेकर भावे श्री राम मंदिर ट्रस्ट तर्फे देखील विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत हरिनाम गजरात झाले. यावेळी एक जप माळ रामरायाची उपक्रम उत्साहात झाला नगर प्रदक्षिणा मार्गे निघालेली शोभायात्रा माऊली मंदिरा समोर जयघोष करीत श्री गणेश आरतीने सांगता झाली. यावेळी ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. वारकरी साधक दिंडी मिरवणूक आणि शोभायात्रेतील श्रीरामराय पालखीचे ठिकठिकाणी भाविकांनी स्वागत केले. यासाठी श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण, श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, उपाध्यक्ष विलास तात्या बालवडकर, सचिन महाराज शिंदे यांनी परिश्रम घेतले. दिंडी मिरवणुकीत महिला भाविकांनी श्रींचे पूजन मोठ्या भक्तिमय उत्साहात केले. या सोहळ्या निमित्त श्री माऊली मंदिर, श्री राम मंदिर, श्री नरसिंह सरस्वती स्वामी मंदिर, भैरवनाथ मंदिर, श्री हजेरी मारुती मंदिर, आनंद स्वामी मंदिर, सिध्दमस्त नाथ गड, आनंद स्वामी मठ, श्री काळाराम मंदिर, श्री राम मंदिर कुऱ्हाडे आळी आदी ठिकाणी धार्मिक मंगलमय वातावरणात श्री रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या दिनी धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेत श्रींची पूजा, मिरवणुकीची सांगता महाप्रसाद वाटपाने हरिनाम गजरात झाली.