VidharbhaWARDHA

शरद पवारांना पाठिंबा देण्याकरिता ‘राष्ट्रवादी’चे १०० पदाधिकारी वर्ध्यातून मुंबईकडे रवाना!

वर्धा (प्रकाश कथले) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजितदादा पवार यांच्या बंडानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा देण्याकरिता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे १०० पदाधिकारी, कार्यकर्ते आज मुंबईकडे रवाना झाले. मुंबईच्या वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये हे कार्यकर्ते उद्या पोहोचणार असून, तेथे ते जिल्ह्याचे समर्थन शरद पवार यांना जाहीर करणार आहे.

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. यादरम्यान, जिल्ह्यातून प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात १०० पदाधिकार्‍यांसह शरद पवार यांना पाठिंबा देण्याकरिता हे शेकडो कार्यकर्ते रवाना झाले आहे. प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले हेदेखील आपल्या शंभर पदाधिकार्‍यांना घेऊन शरद पवार यांना समर्थन देण्याकरिता वर्धा येथून मुंबईकरीता निघाले आहे. अजित पवारांच्या बंडानंतर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात शरद पवार यांना पाठिंबा दर्शविला होता. या सर्व पदाधिकार्‍यांना आणि कार्यकर्त्यांना घेऊन प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले हे मुंबई येथे उद्या आयोजित केलेल्या वाय बी सेंटर येथील बैठकीस शरद पवार यांना पाठिंबा देतील.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!