BuldanaCrimeVidharbha

मुलाला मारहाण करुन  नगरसेविकेचा विनयभंग

 

 

बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी) लोणार – मुलांच्या भांडणातून दोघांनी घरात घुसून नगरसेविकेच्या मुलास मारहाण करीत नगरसेविकेचा विनयभंग केला. ही घटना २६ जून रोजी सायंकाळी घडली.

याबाबत असे की, शहरातील ३८ वर्षीय नगरसेविकेचा १३ वर्षीय मुलगा व तुषार संचेती या दोघांमध्ये भांडणे झाली. या कारणावरुन २६ जून रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास तुषार पुखराज संचेती व बादल पुखराज संचेती या दोघांनी नगरसेविकेच्या घरात घुसून मुलाला लाथा – बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी नगरसेविका भांडण सोडविण्यास गेली असता तुषार संचेती याने वाईट उद्देशाने हात पकडून विनयभंग केला.त्यानंतर मुलाला घरातून बाहेर नेत पट्टयाने मारहाण केली. नंतर नगरसेविका पती व शहरातील एक इसम आले असता दोघांना मुलाला सोडून दिले. त्यानंतर नगरसेविका ही मुलासह पोस्टेला तक्रार देण्यासाठी जात असतांना तुषार संचेती व बादल संचेती जीवे मारण्याची धमकी देत किराणा दुकान जाळण्याची धमकी दिली. अशी तक्रार नगरसेविकेने लोणार पोस्टेला दिली. यावरुन लोणार पोलिसांनी तुषार पुखराज संचेती व बादल पुखराज संचेती या दोघांविरुध्द कलम ४५२, ३५४, ३२४, ३२३, ५०६ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!