बुलडाणा-(ब्रेकींग महाराष्ट्र) दोन दिवसापुर्वी आ.संजुभाऊ गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना दुरध्वनी संदेश जारी करुन शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेतच असल्याचा संदेश देवून उध्दव साहेबांनी काँग्रेस व राष्ट्रवादीशी युती तोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी रॅली काढली होती. यामुळे उध्दव साहेबांसोबत कोण, एकनाथ शिंदे गटासोबत कोण, अशी लढाई सुरु झाल्याने 27 जून रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाभरातील शिवसैनिक बुलडाणा येथील गर्दे हॉल सभागृह येथे शेकडोच्या संख्येने एकवटून त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ हिंदु ह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, जय भवानी जय शिवाजी, हा आवाज कुणाचा शिवसेनेचा, हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा, अश्या घोषणा दिल्या. परंतु भाषणामध्ये सर्वांनी त्या दोन आमदारांच्या नावाचा उल्लेख मात्र टाळला, हे विशेष!
खा.प्रतापराव जाधव बाहेर असल्याने त्यांनी शिवसैनिकांशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधीत काल परवा काहींनी जयस्तंभ चौकात निदर्शने केली. त्याचा शिवसेनेच्या अधिकृत भूमिकेशी कुठलाही संबंध नसून जिल्ह्यातील शिवसेना ही एकसंघपणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असून सगळ्यांनी एक विचाराने, एक दिलाने भगवा कायम खांद्यावर ठेवावा, असे आवाहन केले. तर शिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांनी जिल्ह्यातील सेनेचे दोन आमदार हे एकनाथ शिंदे सोबत गेले. आता जिल्ह्यातल्या शिवसेनेचे काय होणार, अशा वावटळ्या उठवल्या गेल्या. मात्र या मेळाव्याला शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी शेकडोच्या संख्येने उपस्थिती दाखवून दिले आहे की, ही खरी बाळासाहेबांची, उद्धव साहेबांची शिवसेना आहे. कितीही जावोत त्याचा काहीही फरक पडणार नाही म्हणाले, मात्र शेवटी त्यांनी ते दोन्ही आमदार परत येतील, अशी अपेक्षा सुध्दा व्यक्त केली. तर प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी ज्यांना जायचे त्यांनी राजीनामे देवून जा, असे म्हणत शिवसेनेची खरी ताकद सामान्य शिवसैनिक असल्याचे सांगितले. पुढे प्रा.खेडेकर यांनी जी काही नाराजी असेल ती मातोश्रीवर जाऊन पिताश्रींना भेटून सांगा असे सांगत, शिवसेनेला फूट नवीन नाही. सन १९९० ला बुलडाणा येथे डॉक्टर गोडे फुटले होते. मात्र बुलडाणा हा शिवसेनेचा गड असून येथे बाण चालतो. येथे भगव्याची फौज आहे. जो कोणी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खूपसेल त्याला शिवसैनिक राजकारणातून संपवतील, असेही ते म्हणाले. तर महिला आघाडी प्रमुख चंदाताई बढे यांनी बंड करणाऱ्यांना आई तुळजाभवानी सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना केली. पुढे दत्ता पाटील, शांताराम दाणे , बाबुराव मोरे, छगन मेहेत्रे, संजय हाडे, भोजराज पाटील, संतोष डीवरे, रामदास चौथनकर, डॉ.मधुसूदन सावळे, अशोक इंगळे यांच्यासह अनेकांनी आपली भूमिका व्यक्त करत जिल्ह्यातील शिवसैनिक शिवसेना ही उद्धव साहेबांसोबत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. या मेळाव्याला वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय हाडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख चंदाताई बढे, माजी जिल्हाप्रमुख धीरज लिंगाडे, माजी नगराध्यक्ष छगन मेहेत्रे, उपजिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, भोजराज पाटील, बाबुराव मोरे, दीपक बोरकर, शिवाजीराव देशमुख, मोताळा तालुका प्रमुख रामदास चौथनकर, बुलडाणा तालुका प्रमुख लखन गाडेकर, संतोष डिवरे, विजय साठे, कपिल खेडेकर, दादाराव खार्डे, डॉक्टर मधुसूदन सावळे, शिवप्रसाद ठाकरे, युवा सेनेचे निलेश राठोड, हेमंत खेडेकर, धनश्रीराम शिंपणे, लताताई पारस्कर, शांताबाई शेळके, रुक्मिणीताई राणे, वंदनाताई नाईक, शोभाताई पाटील व वैशालीताई ठाकरे, श्रीकांत पवार, विश्वंभर लांजुळकर, इकबाल सय्यद, सुखदेव शिकलकर, यांच्यासह अन्य पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
खरंच..ते ‘दोन’ आमदार परत येतील का?
एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या गुवाहाटी येथील हॉटेल रेडिसन ब्लू मध्ये असलेले आ.संजय गायकवाड व आ.डॉ.संजय रायमुलकर यांचे नाव न घेता ते दोन आमदार परत येण्याची अपेक्षा शांत व मृदू स्वभाव असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांनी व्यक्त केली. मात्र, सध्या एकनाथ शिंदे गटाचे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहचल्याने ते दोन आमदार परत येतील का? त्यांना परत आणण्यासाठी खा.प्रतापराव जाधव काही प्रयत्न करतात का, हे मात्र येणारा काळ आणि वेळेच सांगू शकेल, एवढे मात्र निश्चीत!