बुलढाणा (खास प्रतिनिधी) – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत राज्यामध्ये विहितमुदतीत मजुरी अदायगी करण्यात बुलढाणा जिल्हा राज्यात अव्वल ठरल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांचा राज्यस्तरारवर गौरव करण्यात आला आहे. जिल्हयामध्ये जे मजूर श्रमाचे काम करण्यास तयार आहेत, अशा मजुरांना गावातच अकुशल स्वरूपाचा रोजगार उपलब्ध करून देण्याकरीता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अधिनियम 2005 राबविण्यात येत आहे. सोबतच गावांमध्ये शास्वत स्वरूपाची मालमत्ता निर्माण करणे व पात्र लाभार्थ्यांना निकषानुसार, वैयक्तीक स्वारूपाची कामे देऊन त्यांच्या उत्पनात वाढ करून त्यांचे जिवनमान उंचावणे हा उद्देश आहे.
या योजनेमध्ये मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांची मजुरी ठरवून दिलेल्या वेळेतच 8 दिवसांत मजुरी मजुरांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे बंधनकारक केलेले आहे. बुलढाणा जिल्हयात मागील सतत 4 वर्षापासुन मजुरांना त्यांची मजुरी 8 दिवसांत अदा करण्यात येत आहे. या बाबतीत महाराष्ट्रात जिल्हा अग्रेसर असुन या उत्कृष्ट कामाची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली. दरम्यान, यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल मुख्यमंत्री यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सीईओ विसपुते यांच्यासह बुलढाणा जिल्हाधिकारी एच.पी.तुम्मोड, पंचायत समिती चिखली, खामगांव,संग्रामपूरचे गट विकास अधिकारी, जिल्हा एम आय एस समन्वयक सचिन श्रीवास्तव व इतर कर्मचारी यांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच रिजेक्शन ट्रांजेक्शन क्लियर केल्याबददल मोहोड उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं.) जि.प. बुलढाणा व माचेवाड उपजिल्हाधिकारी (रोहयो) बुलढाणा यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.