बुलढाणा (प्रशांत खंडारे) – जिभेचे लाड पुरविण्यासाठी कधी कोण काय करेल? याचा नेम राहिला नाही.काल चिखलीतून अज्ञात बकरीचोराने मोहम्मद इजाज शेख शफीक शेख बिस्मिल्ला यांच्या मालकीच्या ३ बकऱ्या लांबविल्या आहे. उद्या होळीची कर असल्याने हड्डीफोड कार्यक्रमाने बकरीचोराची धुळवड मस्त साजरी होणार असून, पशुपालकाला मात्र आर्थिक फटका बसला आहे.
होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीचा दुसरा दिवस म्हणजेच रंगपंचमी. या दिवसाला ग्रामीण शब्दात धुळवड म्हणतात.धुळवड होळीपेक्षा आणखी जल्लोषात साजरी केली जाते.खवय्ये जिभेचे लाड पुरविण्यासाठी धुळवडीला जेवणावळीचा बेत आखतात. जिल्ह्यात धुळवडीला सामिष भोजन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उद्या होळीचा रंग अधिक खुलविण्यासाठी व्हेज- नॉनव्हेज पार्ट्या रंगणार आहे.पार्टी म्हटली की दारू,मटण आलेच.गांजाचा धूराळाही उडणार आहे. अनेकांनी पूर्वसंध्येलाच नियोजित जागेत पार्ट्या ठरविल्या तर काही ठरणार आहेत. उद्या शॉपमध्ये मटण, चिकन, मासे खरेदी करण्यासाठी झुंबळ उडणार आहे. मग अशात बकरी चोर तरी कसे मागे राहणार? अज्ञात बकरीचोराने संधी साधून होळीच्या पूर्वसंध्येला चिखली शहरातील जुनेगाव येथील मोहम्मद इजाज शेख शफीक शेख बिस्मिल्ला यांच्या मालकीच्या २ लाल व १ पांढरी अशा ३ बकऱ्या लंपास केल्या. या संदर्भात चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल असून, मोठ्या चोरट्यांसह भुरटेचोरही सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.