बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी)
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या साध्या स्वभावाचा गैरफायदा महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी
घेतल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी होती असा गौप्यस्फोट खासदार प्रतापराव जाधव यांनी दिल्ली येथे ऐका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
पुढे खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की काल मुंबईतील मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्यावर खासदारांची बैठक नव्हती त्यामुळे उपस्थित राहण्याचा प्रश्नच नव्हता, मी शेतकरी कुटुंबातील असल्याने मला ईडी, सीबीआयची
भिती बाळगण्याचे काही कारण महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती राष्ट्रवादी काँग्रेसने खुप आग्रह केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद स्विकारावे लागले मात्र
शिवसेनेच्या आमदारांमध्ये जि काही चर्चा होती जि आम्हाला ऐकायला मिळत होती त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात जे शिवसेनेचे आमदार निवडून आले त्यांना निधी कमी मिळत होता आणि ज्या जिल्ह्यात शिवसेनेची ताकद जास्त आहे अश्या ठिकाणी पालकमंत्री मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे करण्यात आले विशेष करून लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला हरवून विजयी झाले त्या ठिकाणचे पालकमंत्री पद सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडे ठेवले मुंबई मध्ये निश्चित महाविकास आघाडी सत्तेत होतो मात्र बुलडाणा जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात विरोधी पक्षांची भूमिका मला निभवावी लागत आहे असेही खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले शेवटी खा प्रतापराव जाधव म्हणाले की आम्ही सध्या शिवसेनेतच आहोत खासदार असल्याने आमचे काम दिल्लीत आहे शिवसेनेतील सर्व सुरळीत व्हावे , हीच माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाची ईच्छा आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील दोन्ही शिवसेना आमदार
ना. एकनाथ शिंदे यांच्या सोबत
बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड व मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय रायमुलकर हे दोघेही खासदार तथा शिवसेना संपर्कप्रमुख प्रतापराव जाधव यांच्या जवळचे व विश्वासू मानले जातात बुलढाणा जिल्ह्यातल्या दोन्ही आमदारांनी ना एकनाथ शिंदे यांना साथ दिली असून त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे खासदार प्रतापराव जाधव यांना दोन्ही आमदारांच्या बंडाची कल्पना अगोदरच होती का ? अशी चर्चा आता जिल्हाभर सुरू आहे कारण दोन्ही आमदार खासदार प्रतापराव जाधव यांच्या अतिशय जवळचे मानले जातात.