खामगांव (ब्रेकिंग महाराष्ट्र):- वाट दाखवणारेही पुष्कळ आणि वाट लावणारेही. परंतु वाटच नसतांना ती निर्माण करून त्यावर बोट धरून चालायला लावणाऱ्या लोकनेते स्व़.भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंती दिनी हजारो चाहत्यांनी त्यांच्या समाधी स्थळी “शक्ती स्थळ” सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगांव रोड, येथे त्यांना अभिवादन केले. यानंतर सामान्य़ रुग्णालय खामगांव येथे आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या स्था.वि.निधीतून रु.50 लक्ष किमतीचे वैद्यकीय उपकरणे व साहित्य़ाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलतांना आमदार ॲड आकाश फुंडकर म्हणाले की, स्व़.भाऊसाहेबांच्या स्व़प्नातील मतदार संघ करण्याचे ध्येय असून त्यापैकी तालुकास्तरावर सर्वोत्कृष्ट़ वैद्यकीय सेवा सामान्य़ रुग्णालयात मिळणे हे एक आहे, आज आपण त्या स्वप्नपुर्तीपर्यंत आलो आहे. अजुन काही बाबींची कमतरता आहे ते लवकरच पुर्ण करण्याचा प्रयत्ऩ स्व़. भाऊसाहेबांचा व या मतदार संघाचा पुत्र या नात्याने मी नक्कीच पुर्ण करु शकेल अशी भावना व्यक्त़ करुन त्यांनी श्रध्दांजली अर्पण केली.
आज सामान्य़ रुग्णालय खामगांव येथे सर्व सामान्य़ गोर गरीब जनतेला आवश्यक़ असलेल्या सुविधा मिळण्याचे दृष्टीने वार्मर 7, ड्रेसींग ट्रॉली 3, एक्स़ रे बॉक्स़, फॉगर, लॅरी स्कोप, मॉनीटर,निओ नॅटल मॉनिटर, डेफीबीलॅटर, आर्थोपिडीक टेबल, ऑडीओमिटर, इ ॲण्ड टी इन्स्ट्रुमेंट, इ एन्ड टी सर्जरी सेट, ऑथेर्पिडीक इंन्स्ट्रुमेंट, लाच सेट, टयुबक्टोमाय सेट, व्हेसेक्टोमाय सेट या वैद्यकीय साहित्य व उपकरणांचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या निधीतून लोकार्पण करण्यात आले. या सर्व उपकरणांचा दैनंदिन रुग्णसेवांमध्ये अत्यावश्यकता असते. त्यासाठी आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी रु 50 लक्षनिधी आ.स्था.वि.निधीतून मंजूर केला आहे.
तसेच यावेळी रिक्त पदे भरण्यासाठी सामान्य रुग्णालयातील कर्मचारी व देणाऱ्या परिचारिका भगिनी यांच्याकडून निवेदन देण्यात आले. यावर प्रतिक्रीया देतांना आमदार ॲड आकाशदादा फुंडकर म्हणाले की, लवकरच सामान्य़ रुग्णालयातील सर्व रिक्त पदे भरण्यात येऊन उच्च़ दर्जाची रुग्णसेवा अधिक दर्जेदार प्रभावी पणे पुरविल्या जाईल. एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल प्रमाणे तालुका स्तरावरील सामान्य रुग्णालयात सुविधा व रुग्णसेवा पुरविली जावी हे स्व.भाऊसाहेबांचे स्वप्न होते. आज आपण स्वप्नपुर्ती पर्यंत आलोय अजून काही बाबींची आवश्यकता आहे. त्या स्व.भाऊसाहेबांचा व या मतदार संघाचा पुत्र म्हणून मी लवकरच पुर्ण करेल.
यावेळी लोकार्पण सोहळया प्रसंगी भाजप सोशल मीडियाचे प्रदेश सहसंयोजक सागरदादा फुंडकर,सामान्य रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक निलेश टापरे,रुग्ण कल्याण समितीचे संजय शिनगारे, *राम मिश्रा* , शेखर पुरोहित, तालुकाध्यक्ष सुरेशभाऊ गव्हाळ भाजपा विद्यार्थी आघाडीचे पवन गरड उपस्थित होते. सामान्य रुग्णालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आयोजकांचे आभार सुद्धा मानले