खामगाव (ब्रेकिंग महाराष्ट्र):- शेतकऱ्यांचे, गोरगरीब जनतेचे कैवारी सर्वसामान्यांमध्ये नेतृत्व निर्माण करणारे महाराष्ट्रातील लोकनेते स्वर्गीय भाऊंसाहेबांची फुंडकर यांची जयंतीनिमीत्य आज 21 ऑगस्ट रोजी जिल्हाध्यक्ष आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या शुभ हस्ते व सोशल मीडिया सेल प्रदेश सह सयोंजक सागर दादा फुंडकर यांच्या उपस्थित खामगाव शहरातील प्रभाग क्र. 15,2,७,९,१४ मध्ये ३.५४ कोटी रुपयांचे कामांचे लोकार्पण व भूमिपूजन थाटात पार पडले.
यामध्ये प्रभाग 15 मध्ये अशोक ठोसर ते शकुंतला विहार लेआऊटला जोडणारा नवीन पुल रु 83 लक्ष, प्रभाग 14 मध्ये खुल्या जागेवर बगीचा विकसीत करणे गुप्ता लेआऊट रु.43 लक्ष, प्रभाग 2 मध्ये क्रिडा संकुल येथे कामासह गेट बांधकाम, सामान्य रुग्णालय खामगांव येथे रु 50 लक्ष वैद्यकीय उपकरणे व साहित्य वाटप, प्रभाग 7 शिंगणे महाविद्यालयास पोच रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे रु.32 लक्ष, प्रभाग 9 संत रोहिदास महाराज सभागृहा जवळ पेवर ब्लॉक बसविणे रु.10 लक्ष, प्रभाग 3 येथे चर्मकार समाज टाऊन हॉल विकसीत करणे रु.30 लक्ष, प्रभाग 3 श्री माने ते इंगळे यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम करणे रु 20 लक्ष्, प्रभाग 3 रमाई सभागृह येथे पहिल्या मजल्याचे बांधकाम करणे रु 64 लक्ष. या एकुण 3 कोटी 54 लक्ष रुपयांच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन आज लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून थाटात संपन्न झाले.
सतीफैल भागातील भूमिपूजन सोहळयास दर्शन सिंहाजी ठाकूर,नगरसेविका सौ लताताई गरड,नगरसेवक हिरालाल बोर्डे,माजी नगरसेवक चंद्रकांत रेठेकर रामू अहिर,प्रताप सिंह निंदाने,राम बोंद्रे,अमोल अंधारे,कृष्णा ठाकूर विनोद लुटे,चक्रधर बेलोकार, गोलू ठाकूर,चंद्रकांत ढोले,तरण सिंह चव्हाण,विलास खीरडकर,भिकाजी रेठेकर,बंटी बोरे,गजानन शिरसागर सुभाष इटणारे,मन्ना यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
तर सर्व भूमिपूजन व लोकार्पण सोहळयास शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, संजय शिनगारे,राम मिश्रा,पवन गरड,आशिष सुरेका, रोहन जयस्वाल, विकी रेठेकर,नगेंद्र अण्णा रोहनकार,प्रसाद एदलाबादकर, अनीस जमादार, विजय महाले, प्रतीक मुंडे पाटील, रवि गायगोळ, सुनिल वानखडे, माधवराव कांबळे, यांची उपस्थिती होती. तर शहरातील विविध कार्यक्रमांना , गणेश सोनोने, जितेंद्र पुरोहित, इद्रिस सर, अरुण आकोटकर, लोखंडे आजी, अनिल बोरोकार, सदगुणराव देशमुख, चव्हाण सर, श्री मावळे,प्रदेश पदाधिकरी,जिल्हा पदाधिकारी, शहर पदाधिकारी,लोक प्रतिनिधी, विशेष आमंत्रित, कार्य. सदस्य,महिला मोर्चा,युवा मोर्चा, विद्यार्थी आघाडी,युवती आघाडी, सर्व आघाडी प्रमुख, प्रभाग प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.