चिखली (विशेष प्रतिनिधी) – माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसांनिमित्त लिलावती फाऊंडेशनतर्फे जिल्हा परिषद मराठी तसेच जिल्हा परिषद उर्दू शाळा मेरा खुर्द यांना भिंतीवरील घड्याळ भेटवस्तू म्हणून देण्यात आली व उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी लिलावती फाऊंडेशनचे अध्यक्ष महेंद्र वाघमोडे, मराठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेश खराडे, उपाध्यक्ष गोविंद सुसर, उर्दू शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोसीन देशमुख, शे. अनिस शेठ, राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हा सचिव नदीमभाई देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दिपक शिंगणे, नंदुभाऊ वराडे, दामुअण्णा वाघमारे, योगेश गुजर उपस्थित होते. तसेच मराठी शाळेचे मुख्याध्यापक परिहार सर आणि उर्दू शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
Leave a Reply