बिबी (प्रतिनिधी) – सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकर्यांनी भरलेला खरीप हंगामाच्या पीकविम्याची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्या नेतृत्वात सिंदखेडराजा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आपण शेतकर्यांच्या सोबत असून, शेतकर्यांना पिक विमा मिळावा या मागणीसाठी वेळोवेळी पिक विमा कंपनीला पत्रव्यवहार केल्याचे कृषी अधिकारी यांनी सांगितले. तसेच, येत्या २० तारखेपर्यंत शेतकर्यांच्या खात्यात पीकविम्याची रक्कम जमा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी दिला आहे. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष विकास उगले, रामविलास उगले, सर्जेराव क्षीरसागर, प्रदीप चव्हाण, संतोष राठोड, गजानन निकाळजे, कैलास उगले, श्रीराम उगले व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
——————-