गोंदिया (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली असून, आज (दि.१८) शेतात पेरणीसाठी गेलेल्या शेतकरी महिलेच्या अंगावर वीज पडून ही महिला जागीच ठार झाली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील मौजा सालेधारणी येथे शेतकरी महिला लीला योगराज हिडामे (वय ४०) या स्वतःच्या शेतात पेरणी करत होत्या. दरम्यान, अचानक पाऊस सुरू झाला व लीलाबाई यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत त्यांचा शेतातच मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे शेतीकामांनी वेग घेतला आहे.
शेतात वीज पडून शेतकरी महिला ठार