आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्या अंतर्गत कार्तिकी यात्रा १७ ते २३ नोव्हेंबर २०२२ या कळवतात यात्रा हरिनाम गजरात लाखो भाविकांच्या उपस्थतीत साजरी झाली. या यात्रा काळात भाविकांच्या दर्शनाची तसेच रहदारीचे गैरम्यान गैरसोय होऊ नये, यासाठी पोलिस मित्र वेलफेयर फाउंडेशन आँफ इंडिया चे पोलीस मित्र कमांडर यांनी प्रभावी सेवा देत फार चांगला बंदोबस्त दिला.
या मुळे पोलिस प्रशासन व मंदिर विश्वस्त कमेटीचे वतीने पोलीस मित्रांचे कौतुक आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी केले. पोलीस मित्रांचे वतीने बंदोबस्तासाठी पोलिस मित्र वेलफेयर फाउंडेशन आँफ इंडिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवाजी जाधव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष उदय काळे ,पश्चिम महाराष्ट्र जाँइंट अध्यक्ष बाळासाहेब मुंगसे, प. म. उपाध्यक्ष भागवत काटकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद धनवे, प. म. कमांडर किरण कोल्हे, प. म. सचिव लहु अमराळे, सोशल मिडिया कमांडर वैभव दहिफळे, खेड ता. उपाध्यक्ष तुशार मुंगसे, कमांडर देवेंद्र पिंगळे, कमांडर म्हसनाजी मेहत्रे, प्रविण अवसरमोल, विठ्ठल डिसळे, संतोष वानखेडे, बाळासाहेब खांडेकर, रामचंद्र सोलनकर, आकाश परिहार, नितीन आर्य, विशाल टाकळकर, हेमंत गुळीक, संदिप म्हस्के, संदिप चोपडे, सचिन औवसरे यांचेसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस मित्रांचे तसेच इतर सर्व स्टॅफच्या तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आळंदीतील पोलीस बंदोबस्त प्रभावी पणे सेवारत राहत सेवा देता आल्याचे शिवाजी जाधव यांनी सांगितले.