Breaking newsCrimeHead linesMaharashtraMarathwadaVidharbha

पुसद आगाराच्या बसला नगर जिल्ह्यात अपघात, एक ठार, चालक-वाहकांसह प्रवासी गंभीर!

शेवगाव (जि.नगर)/ प्रतिनिधी
पुसद आगाराच्या एसटी बस व मालवाहू टेम्पो यांच्यात शेवगाव तालुक्यातील राक्षी येथे पेट्रोलपंपाजवळ समोरासमोर भीषण धडक होऊन, टेम्पो चालक जागीच ठार झाला तर एसटी चालकाने प्रसंगावधान राखून बस नांगराटीच्या शेतात वळविल्याने जीवितहानी टळली. तरीही या अपघातात चालक-वाहकांसह प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. आज (दि.१८) सकाळी १० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
शेवगाव तालुक्यातील राक्षी येथील पेट्रोलपंपासमोर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास शेवगावकडून येणारी अहमदनगर- पुसद एसटी बस व ४०७ मालवाहू टेम्पो यांची जबर धडक होऊन टेम्पो चालक जागीच ठार झाला तर एसटीचे चालक व वाहक व आतील पॅसेंजर हे जबर जखमी झाले आहेत. एसटी चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी मात्र बालंबाल बचावले असून, जखमींना १०८ रुग्णसेवेचे मार्फत नगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते.
शेवगाव गेवराई राज्य मार्गावर असणार्‍या राक्षी येथील पेट्रोल पंपासमोर गेवराईकडून येणारा टेम्पो व शेवगावकडून येणारी पुसद आगाराची अहमदनगर-पुसद या बसची धडक इतकी भीषण होती, की एसटी चालकाने एसटीवर नियंत्रण ठेवून जवळच असणार्‍या एका नांगरटीच्या शेतामध्ये वळविली. त्यामुळे जीवितहानी टळली. परंतु एसटी चालक-वाहक व प्रवाशांना जबर मार लागला असून, शेवगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक, संतोष धोत्रे , पोलीस नाईक शहाजी आंधळे यांनी पंचनामा करून जखमींना शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. जखमींवर नगर येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!