चिखली (विशेष प्रतिनिधी) – शेळगाव आटोळ मंडळातील शेतकर्यांचे पावसामुळे अतोनात नुकसान झाले असून, या नुकसानीचा सरसकट सर्व्हे करण्यात यावा, व त्यांना तातडीने मोबदला देण्यात यावा, अशी मागणी कोनड खुर्द ग्रामपंचायतीच्यावतीने चिखली तहसीलदारांकडे करण्यात आलेली आहे. यावेळी अमोना, इसरूळ, मंगरूळ, शेळगांव आटोळसह मिसाळवाडीचे ग्रामस्थ, शेतकरीदेखील उपस्थित होते.
परतीच्या पावसाने शेळगाव आटोळ मंडळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सोयाबीनसह इतर पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे शेळगाव आटोळ, कोनड, अमोना, इसरूळ, मंगरूळ, मिसाळवाडी या भागातील शेतीपिकांचे सरसकट सर्व्हे करून उद््ध्वस्त झालेल्या शेतकर्यांना तातडीने व उचित मोबदला देण्यात यावा, अशी मागणी कोनडच्या सरपंचासह शेतकरी व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. दादाराव सुरडकर, पंजाबराव जावळे, मोतीराम जाधव, सुखदेव जावळे, सुभाष जावळे, गणेश वि. जावळे यांच्यासह परिसरातील गावांचे शेतकरी याप्रसंगी हजर होते.
——————