लातूर (जिल्हा प्रतिनिधी) – समाजात शिक्षण घेऊन अनेक तरुण नोकरी शोधत आहेत. तरूण बाधवानो, नोकरीच्या शोधात फिरत राहू नका. शेतीपुरक व्यवसायाकडे वळा, खर्च कमी उत्पन्न जास्त असते. मग तो शेळीपालन, दुग्ध व्यवसाय असेल किंवा अन्य फक्त व्यवसाय करत असताना लाज हा शब्द विसरून टाकायचे असते, यश आपलेच असते, असे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भरत चामले हे आधार उद्योजकता प्रशिक्षण केंद्रच्या वतीने उदगीर येथे शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी मंचावर उपस्थित तज्ञ मार्गदर्शक डॉ. रघुनाथ जोगदंड, प्रकल्पाधिकारी निलेश मोटे, मुख्याधीकारी राजेंद्र कांबळे, ब्रेकिंग महाराष्ट्रचे सहसंपादक गणेश मुंडे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाल श्रीफल देऊन करण्यात आला. तज्ञ मार्गदर्शक डॉ.रघुनाथ जोगदंड म्हणाले, की सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी आणि महिला बचत गट आदींसाठी आधार उद्योजकता प्रशिक्षण केंद्राच्यावतीने सद्याची परिस्थिती व या व्यवसायाची वाढती संधी याचा विचार करता, उदगीर येथे दिनांक १३ ते १४ ऑक्टोबर २२ या कालावधीत शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसायाचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणात शेळी, कोंबडी, गाय म्हैस यांचा जाती व निवड, आहार व गोठा व्यवस्थापन, आजार, उपचार, लसीकरण, विक्री, नफा, बँकिंग आणि शासकीय योजना आदी विषयावर शेतकरी व तरूण बांधवाना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणार्यास तिन्ही विषयाचे प्रमाणपत्र, प्रोजेक्ट रिपोर्ट नमुना, शेड नकाशा आणि सर्व विषयावरील नोटस प्रशिक्षणामध्ये दिले जाणार आहेत. प्रमाणपत्र व नोट्स मिळतील सदर प्रशिक्षण रामचंद्रराव पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघ कार्यालय, मोंढा उदगीर येथे सुरू आहे. तरी याचा जास्तीत जास्त बंधू आणि भगिनींनी लाभ घेण्याचे आवाहन खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भरत चामले, प्रकल्पाधिकारी निलेश मोटे व मुख्याधीकारी राजेंद्र कांबळे यांनी केले आहे. यावेळी उदगीर तालुक्यातील शेतकरी दयानंद गिरदवाड, बब्रुवान आंब्रे, अफराज देशमुख, सचिन गायकवाड, सुनील कांबळे इत्यादीसह मोठ्या संख्येत उपस्थित होते.