-मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश प्रदान
आळंदी (अर्जुन मेदनकर) : यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या निवारणासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. संस्थानचे योगदान म्हणून हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. २५ डिसेंबर २०२६ रोजी मुंबई येथील मंत्रालयात हा धनादेश प्रदान करण्यात आला.
यावेळी संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज लोंढे, कबीरबुवा आणि पुरुषोत्तमदादा पाटील उपस्थित होते.