-इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती उत्साहात; पालखीची हरिनाम गजरात नगरप्रदक्षिणा
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात भागवत एकादशीनिमित्त लक्षवेधी पुष्पसजावट करण्यात आली होती. ही सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. यावेळी श्रींच्या पालखीची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा काढण्यात आली.
इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समितीच्या वतीने इंद्रायणी आरती उत्साहात पार पडली. यावेळी संयोजक अनिताताई झुजम, अर्जुन मेदनकर, गोविंद ठाकूर, बाबासाहेब भंडारे, बाबुराव मोरे, सरस्वती भागवत, नीलम कुरधोंडकर, अनिता शिंदे, शिला कुलकर्णी, उषा पाटील, कौसल्या देवरे, पुष्पा लेंडघर, तारामती गोरे, काशीबाई अडकने, जयश्री भागवत, उषाताई काकडे, चेतनाताई ढमढेरे आदी मान्यवर उपस्थित होते.