-महामानवाच्या जन्मस्थळाला भेट; समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प
लोणार (वाजिद खान) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्य प्रदेशातील महू येथील जन्मभूमीला ३ नोव्हेंबर २०२६ रोजी लोणार शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस साहेबरावजी पाटोळे, लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्रूजी फुके, माजी सभापती ज्ञानेश्वर चिभडे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास मोरे तसेच वैभव मोरे उपस्थित होते. महू ही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी आहे. या ऐतिहासिक स्थळाला भेट देताना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बाबासाहेबांचे महान कार्य, संघर्ष आणि सामाजिक समतेच्या विचारांचे स्मरण केले. भारतीय लोकशाहीला भक्कम आधार देणाऱ्या संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत बाबासाहेबांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीला भेट देण्याचा हा क्षण उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद ठरला.