-शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केला सन्मान; नगराध्यक्ष मीरा मापारी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, संचेती कुटुंबीयांचे सांत्वन
लोणार (वाजिद खान) : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा राज्यसभेचे खासदार मुकुलजी वासनिक हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना लोणार येथे मुक्कामी होते. यावेळी लोणार शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सौ. अदिती पोहरे यांच्या प्रचारासाठी दौऱ्यावर असलेले मुकुलजी वासनिक हे १० ऑक्टोबर रोजी लोणार येथील हॉटेल विक्रांतमध्ये मुक्कामी होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष लक्ष्मणदादा घुमरे, नानाभाऊ गावंडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विजयभाऊ बुरुंगले आणि संतोष आंबेकर उपस्थित होते. याप्रसंगी लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद आणि तालुका काँग्रेस अध्यक्ष अश्रुजी फुके यांनी मुकुलजी वासनिक यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलालजी गुगलीया, बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश मापारी, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक भूषण मापारी, माजी जिल्हा सरचिटणीस साहेबराव पाटोळे, उपाध्यक्ष आबेद खान, गटनेते नितीन शिंदे, ज्येष्ठ नेते केशवराव फुके, माजी सभापती ज्ञानेश्वर चिभडे, अंबादास इंगळे आणि विकास मोरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नगराध्यक्ष मीरा मापारी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
खासदार मुकुलजी वासनिक यांनी लोणार नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ. मीरा भूषण मापारी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष सौ. मीरा भूषण मापारी, माजी नगराध्यक्ष भूषण मापारी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या भेटीदरम्यान वासनिक यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांची भेट घेतली. यावेळी नगरपालिकेचे आरोग्य सभापती अब्दुल उबेद अब्दुल हाजी मुनाफ, संतोष मापारी, नगरसेवक पंढरी चाटे, शाम राऊत, गुलाब सरदार, शेख जमील कुरेशी, रमजान परसुवाले, माजिद कुरेशी, शेख रऊफ शेख मेहबूब, शंकर हेंद्रे, गजानन मापारी, भवानी मापारी, मोहसीन शहा, शुभम चाटे आणि शिवा मापारी यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदीपकुमार संचेती यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट
दरम्यान, काँग्रेसचे पदाधिकारी प्रदीपकुमार संचेती यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने खासदार मुकुलजी वासनिक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन संचेती कुटुंबीयांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी त्यांनी कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.