-वेदमंत्रघोष व हरिनाम गजरात धार्मिक उपक्रम; इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता व सामाजिक उपक्रमांचे आयोजन
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समिती आणि आळंदी देवस्थानच्या वतीने वेदमंत्रघोष व हरिनाम गजरात उत्साहात इंद्रायणी आरती झाली. यावेळी इंद्रायणी आरती सेवा समितीच्या वतीने इंद्रायणी पूजन करण्यात आले. नदी घाटावर स्वच्छता करून रांगोळी काढण्यात आली. सामाजिक उपक्रम राबवित इंद्रायणी आरती व प्रसाद वाटप करण्यात आले. आळंदी देवस्थानच्या वतीने इंद्रायणी आरतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. धार्मिक उपक्रम राबवित इंद्रायणी आरती करण्यात आली. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
इंद्रायणी आरती सेवा समितीच्या संयोजक अनिता झुजम, सरस्वती भागवत, लता वर्तले, ताई थोरवे, मीनाक्षी जरे, काशीबाई आडकीने, जयश्री भागवत, नीलम कुरधोंडकर, पुष्पा लेंडघर, महासंघ अध्यक्षा सुवर्णाताई काळे, स्वाती कांबळे, अश्विनी लिके, संपदा मेंडजोगी, विमल सकटे, इंदुबाई सरडे, सखुबाई मुंढे, सावित्री गायकवाड, तारामती गोरे, गोविंद ठाकूर यांच्यासह भाविक व नागरिक इंद्रायणी नदी घाटावर उपस्थित होते.