– महिलांचा आक्रोश पाहून स्वतः ठाणेदार गावात गेले, आरोप असलेल्यांना उचलले
चिखली/ मेरा बुद्रूक (ब्रेकिंग महाराष्ट्र) – चिखली तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या अंत्री खेडेकर या गावात दारूबंदी विभागाच्या खुल्या आशीर्वादाने अवैध दारूविक्री जोरात सुरु असून, त्यामुळे गोरगरिब महिलांचे संसार उद््ध्वस्त होत आहेत. विशेष बाब म्हणजे, अंढेरा पोलिसही या प्रकाराकडे कानाडोळा करत असून, यापूर्वी महिलांनी पोलिसांना निवेदन देऊनही काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे गावातील अवैध दारूविक्री तात्काळ बंद करावी, या मागणीसाठी गावाचे सरपंच, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी तथा व शेकडो महिला अंढेरा पोलिस ठाण्यावर धडकल्या. महिलांच्या आक्रोश मोर्चाने ठाणेदारांना निवेदन देत, तातडीने दारूबंदी करण्याची मागणी केली.
चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर हे गाव जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या सर्वांच्या परिचित आहे. या गावातील अनेकजण कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती , जिल्हा परिषद , तथा आमदार असे अनेजणांनी पदे भूषविली आहेत. अशा या लोकप्रतिनिधींच्या गावांमध्ये दारुबंदी विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे अर्थपूर्ण दुर्लक्ष करून अवैध देशी दारू , गावरान दारू विक्रीकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच, अंढेरा पोलिसही या दारूविक्रेत्यांवर कारवाई करत नाही. अंढेरा पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या पीडित महिलांनी आरोप केला, की गावात आत्माराम भिवाजी आव्हाड वय ४२ वर्ष हे गुरांच्या सरकारी दवाखान्याजवळ, गौतम रामभाऊ मोरे वय ५७ वर्ष गुरांच्या सरकारी दवाखान्याजवळ, विशाल गौतम मोरे वय ३५ वर्ष गुरांच्या सरकारी दवाखान्याजवळ, शिवशंकर संपत गायकवाड वय ५५ वर्ष झोपडपट्टी पाण्याच्या टाकीजळ, विठोबा सोमा मोरे वय ६० वर्ष मुस्लीम मज्जीद जवळ झोपडपट्टी आणि ६ संतोष आश्रु मोरे वय ६५ वर्ष श्री नेहरु विद्यालया शेजारी असे एकूण सहा जण राजरोसपणे अवैध दारूविक्रीचा व्यवसाय करतात. या अवैध देशी दारू मुळे अनेक गोरगरिब महिलांचे संसार उघड्यावर आले आहेत, तर अनेक महिला पुरुषांनी गळफास, विषारी औषध , घेवून आत्महत्या केल्या आहेत. तसेच तरूणपिढी व्यसनाधीन होत असल्याने गावात बेरोजगार युवकांना विद्युत पोलच्या मजुरीचे काम करावे लागत आहे. यावर आळा घालण्यासाठी सरपंच सचिन खेडेकर , उपसरपंच , भास्कर मोरे, सदस्य भिका खेडेकर , यांनी ग्रां. प. ठराव घेवून दारूबंदी विभागाला दिला. मात्र तक्रार देवून दारुबंदी अधिकार्याचे अर्थपूर्ण व्यवहार असल्याने अवैध दारू विक्री बंद झाली नाही. दारूच्या नशेत अनेकजण रस्त्यावर, शाळे शेजारी , मंदिरा जवळ, सरकारी दवाखान्यात अशा ठिकाणी जावून धिगांना करून शिवीगाळ करतात. महिलांना व तरुण मुलींना शौचालय जाणे कठीण झाले आहे. हा त्रास दिवसेदिवस वाढत चालल्याने अखेर महिलांनी दारूबंदी विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला जावून धडकल्या. महिलांचा आक्रोश पाहून ठाणेदार गणेश हिवरकर यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन देत, अंत्रिखेडेकर गाठले आणि तक्रारी मध्ये नमूद केलेल्या लोकांना उचलले.
यावेळी अंत्री खेडेकर येथील ग्रामपंचायत सरपंचपती सचिन खेडेकर , उपसरपंच भास्कर मोरे, पोलीस पाटील रामदास मोरे , राष्ट्रवादी कांग्रेसचे चिखली तालुका उपाध्यक्ष भिकाजी खेडेकर , संभाजी ब्रिगेडचे चिखली तालुकाध्यक्ष योगेश खेडेकर , विठ्ठल खेडेकर, , पो पा रामदास मोरे , पंचशील बहूउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बबन तुकाराम मोरे , सचिव समाधान नामदेव मोरे , भगवान मोरे , उत्तम मोरे , विलास मोरे , मंदाबाई वसंता मोरे , वच्छला उत्तम मोरे , संगीता मदन मोरे , यशोदाबाई मोरे , रंजना वसंतराव खेडेकर, वर्षा कैलास मोरे, सविता रमेश मोरे, संगीता मदन मोरे, रंजना समाधान मोरे, सरिता किरण झिने, सीमा नामदेव गवइर्, सविता समाधान मोरे, सविता सुरेश मोरे, शोभा वसंत मोरे, प्राजक्ता मोरे, आरती पुरुषोत्तम पवार, सुरेखा विजय मोरे व इतर ५० ते ६० महिला आदी उपस्थित होते. या निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांनादेखील देण्यात आली आहे.
या आधीसुद्धा महिलांनी अंढेरा पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन दिले होते. परंतु पोलीस स्टेशनच्या दुर्लक्षतेमुळे गावामध्ये देशी दारू सुरू होती. वरली मटकाही राजेरोसपणे सुरु आहे. वरली व देशी दारू यामुळे गावातील भरपूर मुले व्यसनाधीन झाली आहेत. त्यामुळे गावात वाद होऊन रस्त्याने जाताना दारुड्यामुळे गावातील महिलांना घराच्या बाहेर निघणेसुद्धा कठीण झाले आहे.