-लोणारच्या ऐतिहासिक ‘झोपलेला मारुती’ मंदिरात हजारो भाविकांची मांदियाळी; महाप्रसाद आणि महाआरतीने दुमदुमली लोणार नगरी!
लोणार (वाजिद खान) : संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या ऐतिहासिक लोणार नगरीत आज एक अपूर्व धार्मिक सोहळा पार पडला. संपूर्ण भारतात शनिदेव आपल्या पत्नीसह विराजमान असलेले एकमेव अद्वितीय स्थान आणि निद्रावस्थेतील संकटमोचन प्रभू हनुमानाचे जागृत देवस्थान असलेल्या ‘हनुमान मंदिर संस्थान (झोपलेला मारुती परिसर)’ येथे ‘शनि जयंती’ व ‘शनि अमावस्या’निमित्त आयोजित भव्य शनि जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
या दुर्मिळ योगानिमित्त आज लोणार शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून व देशभरातून आलेल्या हजारो भाविक भक्तांनी दर्शनासाठी सकाळपासूनच मंदिरात अभूतपूर्व गर्दी केली होती. अभिषेक, महाप्रसाद आणि महाआरतीने अवघी लोणार नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली: महोत्सवाचे औचित्य साधून मंदिराच्या वतीने दिवसभर विविध धार्मिक व भक्तीपर विधींचे नेटके आयोजन करण्यात आले होते.
सकाळी शुभमुहूर्तावर संकटमोचन बजरंग बली, शनिदेव आणि त्यांच्या पत्नीच्या मूर्तीवर वैदिक मंत्रोच्चारात भव्य अभिषेक व विशेष पूजन करण्यात आले. त्यानंतर भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. दुपारी ठीक १२ वाजता महाप्रसाद (भंडारा) वाटपाला सुरुवात करण्यात आली. दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चाललेल्या या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी अत्यंत शिस्तीत लाभ घेतला. मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी असूनही सर्व व्यवस्था सुरळीतपणे पार पडली. सायंकाळी ठीक ६ वाजता मंदिरामध्ये भव्य सांगता महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. टाळ-मृदंगाचा गजर, घंटानाद तसेच ‘जय श्रीराम’, ‘जय हनुमान’ आणि ‘शनिदेव महाराज की जय’ या जयघोषाने