CinemaMumbaiWomen's World

फक्त साराला आली सुशांतची आठवण

 मुंबई – फिल्मी दुनिया ही स्वार्थी असते. आज दिवंगत अभिनेता सुशांतसिंह रजपूत याचा स्मृतिदिन होता. दोन वर्षापूर्वी त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूचा अद्याप उलगडा झालेला नाही. त्याचे विस्मरणदेखील चित्रपट सृष्टीला पडले आहे. परंतु, अभिनेत्री सारा अली खान हिने सोशल मीडियावर सुशांतसिंहसोबतचा फोटो शेअर करत त्याच्या स्मृतीला उजाळा दिला.
पहिल्यांदा ज्याच्या सोबत कॅमेरा शेअर केला, त्याची आठवण येते आहे, अशा शब्दांत सारा अली खान हिने सुशांतची आठवण काढली. सारा व सुशांत या दोघांनी केदारनाथ या चित्रपटात सोबत काम केले आहे. त्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!