चिखली (एकनाथ माळेकर) – अंजना आश्रय फाउंडेशन पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा, या ठिकाणी हेमंत कोठावळे व समाजसेविका सौ. गौरी बोरकर मॅडम व अनिल मोरे यांच्या विशेष सहकार्याने जिल्हा परिषद शाळा दरी या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय व क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले.
शाळेतील हुन विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच वह्या, पाटी, पाटी पेन्सिल बॉक्स, पेन्सिल पट्टी शापनर व खोडरबर बॉक्स, इत्यादी साहित्य देण्यात आले व खैळण्यासाठी फुटबॉल, बॅडमिंटन बॅट बॉल टेनिस बॉल व शाळेत खाली बसण्यासाठी चटई यांचा समावेश होता. नवीन शैक्षणिक व क्रीडा साहित्य मिळाल्याने मुलांचा आनंद ओसंडुन वाहत होता. या कार्यक्रम प्रसंगी सुप्रिया कोठावळे, ॲड. ज्योती सातपुते, ॲड. लीना काळे, भारती मराठे, मोनिका छाबरा, मोनिका कालेकर, बिपिन कचरे, राघवेंद्र शेट्टी, समीर पंडित, आशिष ओपलकर, गुणवंत शहा व सहकारी, सोनाली पांडे, आरिफ काचवाला, व अमीर शेख यांचे विशेष सहकार्य लाभले. समाजातील प्रत्येक व्यक्ती ने समाजकार्य साठी पुढे यावे असे यावेळी अनिल मोरे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेमंत कोठावळे सर, गौरी बोरकर व राष्ट्रीय पार्लामेंट पुरस्कार प्राप्त विदर्भ रत्न अनिल मोरे, शालेय समिती अध्यक्ष सुखदेव बोरूडे , उपाध्यक्ष डिंगाबर चौधरी, सरपंच गजानन वाघमारे ग्रा सदस्य रामभाऊ टेकाळे अंगणवाडी सेविका निता हंबीले, कैलास टेकाळे, मधुकर मोरे, अर्जून वाकोडे, सुरेश चौधरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.