– अंत्री खेडेकर प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर
मेरा बुद्रूक, ता. चिखली (प्रताप मोरे) – तब्बल ३२ हजार यशस्वी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम आपल्या शासकीय वैद्यकीय सेवेच्या कारकिर्दीत चिखली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी रचला आहे. त्यांच्या या गौरवास्पद कार्याबद्दल अंत्री खेडेकर येथील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरादरम्यान त्यांचा आरोग्य केंद्रातील कर्मचारी व ग्रामस्थांच्यावतीने छोटेखानी सत्कार करण्यात आला.
अंत्री खेडेकर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, या अंतर्गत मेरा बु., अंबाशी, कोलारा, गांगलगाव असे एकूण चार उपकेंद्र आहेत. या केंद्रा अंतर्गत दरवर्षी शेकडो कुटुंब नियोजन शसत्रक्रिया पार पडतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या आजारामुळे या शस्त्रक्रिया करण्यास महिलांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्याच बरोबर कोरोनाच्या काळामध्ये आरोग विभागाच्या डॉक्टर कर्मचार्यांना जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहावे लागले होते. यावर्षी आरोग्य विभागाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आणि महिलांनी या शिबिराला चांगला प्रतिसाद दाखवीत, दवाान्यांमध्ये भरती झाल्या. या शिबिरात शस्त्रक्रिया करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी दरवर्षी प्रमाणे उपस्थित राहात, शस्त्रक्रिया पार पाडल्या.
शस्त्रक्रिया सुरू होताच विद्युत पुरवठा खंडीत झाला. मात्र दवााखान्यात विजेची व्यवस्था असल्याने शस्त्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडल्या. तेव्हा डॉ.बावस्कर, डॉ.पाठरे , डॉ.करवंदे यांनी सांगितले की, डॉ. राजेंद्र सांगळे यांनी आजपर्यंत ३२ हजार कुटुंब नियोजन शसत्रक्रिया करण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या आरोग्य सुपरवायझर , आरोग्य सेवक , सेविका , रुग्णवाहिका चालक कैलास मोरे या सर्वांनी पुषपगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.