-निराधार वृद्धांची सेवा हिच खरी मानवसेवा – पंडितराव देशमुख;
-जातीय व्यवस्था संपवण्यासाठी पोटजातींत विवाह व्हावेत – प्रा. डॉ. सुभाष राऊत
देऊळगाव घुबे ता. चिखली (राजेंद्र घुबे) : समाज एकत्र येण्यासाठी परिचय मेळावे अत्यंत उपयुक्त ठरतात. जातीय व्यवस्था संपवण्यासाठी आंतरजातीय तसेच पोटजातींमध्येही विवाह व्हावेत, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुभाष राऊत यांनी केले. ऋणानुबंध समाज विकास संस्था व मानवसेवा मल्टी पर्पज फाउंडेशन, चिखली अंतर्गत ऋणानुबंध विवाह मंडळाने आयोजित केलेला बौद्ध उपवधू-वर परिचय मेळावा रविवारी छत्रपती शाहू महाराज सभागृह येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास चिखली नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, प्रा. डॉ. सुभाष राऊत, ॲड. विजयकुमार कस्तुरे, बांधकाम सभापती विष्णू जोगदंडे, नगरसेविका सुनीताताई प्रकाश शिंगणे, नगरसेविका सुप्रियाताई प्रशांत भटकर, नगरसेविका अश्विनीताई बाळू जाधव, नगरसेवक रत्नदीप शिनगारे, दयानंद निकाळजे, फुले-आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष विकी शिनगारे, वंचित अध्यक्ष बाळू भिसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यास राज्यातील विविध जिल्ह्यांतून समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. नोंदणी केलेल्या उपवर वधू-वरांनाच कार्यक्रमस्थळी प्रवेश देण्यात आला. यावेळी चिखली नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
परिचय सत्रात डॉक्टर, अभियंते, वकील, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, उद्योजक, शेतकरी, तसेच घटस्फोटित, विधवा व विधुर यांनी आपला परिचय करून दिला. संस्थेच्या माध्यमातून निराधार वृद्धांची सेवा करणे हीच खरी मानवसेवा असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी केले. मानवसेवा फाउंडेशनच्या वृद्धाश्रमाला आवश्यक ती मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी परिचय मेळावे उपयुक्त ठरत असून समाजाने विवाह सोहळ्यांमध्ये अनाठायी खर्च टाळून साध्या पद्धतीने विवाह लावावेत, असे आवाहन करण्यात आले. मुलींच्या पालकांनी अवास्तव अपेक्षा न ठेवता समाजातील योग्य वर निवडावा, असे मत मेळाव्याचे अध्यक्ष डॉ. सुभाष राऊत यांनी व्यक्त केले. मेळाव्याचे आयोजन प्रशांत डोंगरदिवे यांनी केले. मानवसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत डोंगरदिवे यांनी सूत्रसंचालन केले तर एस. एस. साळवे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपालीताई डोंगरदिवे, रघुवीर डोंगरदिवे, रवींद्र जाधव, मायाताई डोंगरदिवे, वनिताताई जाधव, मनीषाताई इंगळे, सुनील इंगळे, जीवन जाधव, निताताई डोंगरदिवे व रमेश साळवे यांनी परिश्रम घेतले.