–वर्धा येथील राज्यव्यापी मेळाव्यात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची घोषणा
वर्धा (प्रकाश कथले) : सकल कुंभार समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू, तसेच श्री संत शिरोमणी गोरोबा काका मातीकला बोर्डासाठी येत्या अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
वर्धा येथील हेरिटेज सभागृहात सकल कुंभार समाज विकास परिषदेच्या वतीने आयोजित राज्यव्यापी कुंभार समाज मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यास समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Dr. Pankaj Bhoyar यांनी मातीकला बोर्डाचे कार्य लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका मांडली. समाजाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
परिषदेमार्फत संत गोरोबा काका यांचे जन्मस्थान तेर (जि. धाराशिव) या तीर्थक्षेत्राचा विकास देहू-आळंदीप्रमाणे करण्यात यावा, कुंभार समाजाला विधानपरिषदेत प्रतिनिधित्व द्यावे, तसेच वयोवृद्ध कुंभार कारागिरांना दरमहा पाच हजार रुपये मानधन मंजूर करावे, अशा मागण्या मांडण्यात आल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी खासदार रामदास तडस, सुरेशराव वाघमारे, सकल कुंभार समाज विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते, भगवान सूर्यवंशी, उपाध्यक्ष चंदनलाल प्रजापती, सुभाष तेटवार, रमेश बुरबांदे, ओमप्रकाश पांडे, अविनाश ठाकरे, किशोर कल्पे, वसंतराव जवळेकर, राकेश प्रजापती, एकनाथ बुरबांदे, हरीश मंचालवर, बबलू जुगेले, भीमराव डेरे, चेतन बुरबांदे, दिलीप खांडेकर, सचिन इंगळे, संजय वाडकर, राम वरवाडे, गोपाल बनकर, चंद्रकला चिकाने, राजू खरे, शेषानंद पांडे महाराज, शंकर मोहबिया, गंगाधर खांदारे आदी मान्यवर उपस्थित होते.m मेळाव्यात किशोरजी कल्पे, प्रा. सचिन प्रजापती, राजेंद्र अंबेरे व डॉ. अमित बिश्वास या समाजबांधवांना “समाज भूषण” व “समाज गौरव” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.