राजेंद्र काळे
बुलडाणा – नेत्राताई या १९८० पासूनच्या महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या. १९८४ला मुकुल वासनिक बुलडाणा जिल्ह्यात आले तेंव्हा संजय राठोड हे १४-१५ वर्षांचे होते, १९८९ला शिवसेना जोमात असतांना जयस्तंभ चौकात या तरण्याबांड पोराने बाळासाहेब ठाकरे विरुध्द जोरदार भाषण ठोकले होते, तेंव्हा महाराष्ट्रभर गाजून संघर्ष पेटला होता. नंतर एनएसयुआय व पुढे युवक काँग्रेसच्या माध्यमातून संजयचे नेतृत्व राज्यभर पोहचले. दररोज व्यायाम, तासभर पुजापाठ, सैनिकी शाळेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात कामगिरी, सामाजिक माध्यमातून बंजारा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न, राजकारणाच्या माध्यमातून अनेकांना दिलेली सत्तेची पदे.. तर २ वेळा विधान परिषद साठी प्रयत्न करुनही हुकलेली संधी, परंतु गजानन महाराजांवर श्रध्दा असणाऱ्या संजयचे स्वप्न लवकर पुर्ण व्हावीत.. कारण सर्वांगीण असे व्हिजन ठेवून वाटचाल करणाऱ्या संजय राठोड यांचे नेतृत्व व सेवाभावी व्यक्तीमत्व असल्याचे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्यामबाबू उमाळकर यांनी केले.
वाढदिवसानिमित्त अनेकजण अनेक उपक्रम राबवत असतात. परंतु या उपक्रमांसोबतच गेल्या ४० वर्षांपासून जे जुने जाणते लोकं मुकुल वासनिकांसोबत पर्यायाने काँग्रेससोबत निष्ठावान आहे, त्यांचा यथोचीत सन्मान संजय राठोड यांच्या वाढदिवशी त्यांच्या मित्र मंडळाने रविवार २१ ऑगस्ट रोजी धामणगाव बढे येथे केला. मी संजय राठोड यांचा कार्यकर्ता असून मला आमदार करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे आ.राजेश राठोड यांनी प्रांजळपणे सांगून संजय राठोड यांनी माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते पक्षामध्ये मोठे केल्याचे सांगितले. आता त्यांना आमदार करण्याची वेळ आली असून त्यासाठी संपूर्ण कार्यकर्त्यांनी एकजूट होवून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन आ.राठोड यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त २१ ऑगस्ट रोजी धा.बढे येथील गजानन महाराज मंगल कार्यालयात काँग्रेसच्या निष्ठावंत नेते व कार्यकत्र्यांचा सत्कार व सन्मान सोहळ्याला मार्गदर्शन करतांना श्यामबाबू उमाळकर व आ.राजेश राठोड बोलत होते. मुख्त्यारसिंग राजपूत अध्यक्षस्थानी तर प्रमुख अतिथी म्हणून मंठ्याचे आ.राजेश राठोड, शामभाऊ उमाळकर, परिवहन काँग्रेस सेलचे प्रदेश अध्यक्ष अमित मेश्राम, माजी अध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे, गणेश पाटील, गजानन मामलकर, संजय किनगे, सुरेश सरोदे, शकुंतलाताई पाटील, निताताई पाटील, उज्वलाताई मोरे, प्रतिभा महाजन, किशोर मोदे, रविशंकर मोदे, बिसमिल्ला कुरेशी, गफ्फार पटेल, हारूण खासाब, तुळशीराम नाईक, राजाराम पवार, प्रदेश काँग्रेसचे मुख्य समन्वयक रवी पाटील, प्रतिक जाधव, अविनाश पाटील, महेश ढगे, प्रमोद जाधव, विलास चनखोरे, अमित गांधी, शैलेश खेडकर, गजानन पालवे, अलिम कुरेशी, धनराज महाजन, गणेश बस्सी, मिलींद जैस्वाल, असलम पठाण, उदयभान शेलेकर, भागवत बढे, नईम बागवान, परसराम शिरसागर, भागवत लहासे, एकनाथ चव्हाण, हाफीस सादीक, जमीर कुरेशी, गणेश हुडेकर, प्रदिप शिरसागर, रघुणाथ जाधव, सादिक शहा कालीम हुसेन, इमरान पठाण, वसिम खान, संदीप लवांडे, शाम कानडजे, भैय्या पाटील, भगवान पाटील, शिवाजीराव बोराडे, प्रकाश जाटोळ, संजय पाटील, हारूण पटेल, भागवत नप्ते, संतोष पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुख्त्यारसिंग राजपूत म्हणाले की, गेल्या ४० वर्षापासून संजय राठोड एकनिष्ठेने पक्षाची सेवा करत आहे. त्यांनी कधीही पदाकरीता किंवा उमेदवारीकरीता पक्षाकडे अट्टाहास केला नाही. स्वत:च्या ताटात आलेले त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाच दिले. कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे काम संजय राठोड यांनी केले आहे. अनेक कार्यकर्ते मोठ्या पदावर काम करत आहे. ते फक्त संजय राठोड यांच्यामुळेच, या जिल्ह्याची संपूर्ण काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभी आहे, असेही मुख्त्यारसिंग राजपूत म्हणाले. यावेळी शामभाऊ उमाळकर, संजय राठोड, लक्ष्मण घुमरे यांचेसह अनेक मान्यवराचे मार्गदर्शन झाले. जेष्ठ निष्ठावान नेत्यांचा झालेला सन्मान हा आगळा-वेगळा ठरला. हा कार्यक्रम बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे समन्वयक अॅड.गणेश राजपूत यांनी आयोजित केला होता.
काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सत्कार करावा..
माझ्या वाढदिवसानिमित्त माझा सत्कार न करता काँग्रेसच्या निष्ठावंत नेते व कार्यकर्त्यांचा सत्कार करावा, त्यांनीच काँग्रेस पक्ष मोठा केला आहे. त्यांच्या निष्ठेमुळे व परिश्रमामुळेच अनेक ठिकाणी काँग्रेस सत्तेत आली आहे, असे वाढदिवसाच्या सत्कार समारंभाला उत्तर देतांना संजय राठोड म्हणाले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त गांधी भवन बुलडाणा येथे संजय राठोड यांचा सत्कार तसेच महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद बेंडवाल यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरूवातीला संजय राठोड यांचा हार, तुरे देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर जगदंबा नगर व सावित्रीबाई फुले नगरातील २५० महिलांना साड्या तर ५० महिलांना लुगडे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजय अंभोरे यांनी काँग्रेस पक्ष हा गोर गरीबांच्या सदैव पाठीशी उभा राहतो. संजय राठोड हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते आहे. आज संपुर्ण आयुष्य त्यांनी एकाच पक्षात म्हणजे काँग्रेस पक्षात घातले. नाही तर आपण पाहत आहे आज निवडणूकीचे तिकीट नाही मिळाले किंवा पद नाही मिळाले तर कपडे बदलल्या सारखे लोक पक्ष बदल आहे. मात्र संजय राठोड हे गेल्या चाळीस वर्षापासुन एकाच पक्षावर व एकाच नेत्यावर निष्ठा ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख अतिथी म्हणून बार असो.चे अध्यक्ष अॅड. विजय सावळे, काँग्रेसचे नेते दिपक रिंढे, पैठणचे काँग्रेस नेते कांचन चाटे, लक्ष्मण घुमरे, राजाराम पवार, राजु काटीकर, गजानन काळवाघे, अॅड. खाकरे, मिनलताई आंबेकर, अॅड. मजीद कुरेशी, सो नंदिनीताई टारपे, सतिष मेहेद्रे, शहराध्यक्ष दत्ता काकस, रवी पाटील, प्रतिक जाधव, तुळशीराम नाईक, प्रमोद जाधव, शैलेश खेडकर, संतोष पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.