– “ब्रेकिंग महाराष्ट्र”च्या बातमीचा दणका!
– मुख्यालयी न थांबणार्या कर्मचार्यांची नावे जाहीर करणार!
चिखली (एकनाथ माळेकर) – अंत्रीखेडेकर येथे सात वर्षीय बालकाला डेंग्युसदृश आजार झाल्याने गावासह परिसरात खळबळ उडाली होती. तसेच, अंत्रीखेडेकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उशीरा उघडत असल्याने व तेथील अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी थांबत नसल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे डेंग्यु रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त करत, याप्रश्नी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने “अंत्री खेडेकरमध्ये डेंग्युचा रुग्ण, गावात उडाली खळबळ!” या मथळ्याखाली वृत्त प्रसारित केले होते. त्यामुळे जाग आलेल्या आरोग्य विभागाने अखेर आज गावात धूर फवारणी करत, डेंग्युबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले आहे. तसेच, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारीही आरोग्य केंद्रात दिसून आले. हे अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी न थांबल्यास, त्यांनी घरभाडे भत्ता घेऊन शासनाची फसवणूक केल्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली जाणार असून, अप-डाऊन करणार्या कर्मचार्यांची नावे नजीकच्या काळात ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ जगजाहीर करणार आहे.
अंत्री खेडेकर गावात डेंग्यु रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता पाहाता, तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने अंत्री खेडकरमध्ये धूर फवारणी सुरू करण्यात आली आहे. गावामध्ये बरेच डेंग्युसदृश आजाराचे रुग्ण आढळून आले असून, हे रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी परतले आहे. त्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. याची माहिती चिखली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सांगळे, बुलढाणा जिल्हा वैद्यकीय अधिकारी प्रशांत पाटील यांना ब्रेकिंग महाराष्ट्रच्यावतीने देण्यात आली होती. तसेच अंत्री खेडेकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बावस्कर, ग्रामविकास अधिकारी काळेसाहेब यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून या रोगाचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यामुळे आज अंत्री खेडेकर गावामध्ये धूर फवारणी सुरु झाली आहे. ब्रेकिंग महाराष्ट्रच्या तत्परतेबद्दल ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत.