-पत्रकार नवल राठोड यांना ‘संजीवनी दर्पण पुरस्कार’ प्रदान
मेहकर (तालुका प्रतिनिधी) : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डोणगाव येथील संजीवनी सेवाभावी परिवाराच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देऊळगाव साखरशा येथील पत्रकार नवल राठोड यांना संजीवनी दर्पण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान सोहळा १ फेब्रुवारी रोजी राजूरकर मंगल कार्यालय, डोणगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
संजीवनी सेवाभावी परिवाराच्या वतीने स्व. जगदीश बीडवई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षीही समाजसेवा, पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी अशा विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देशमुख होते. यावेळी पत्रकार नवल राठोड यांच्यासह सादिक कुरेशी, गजानन देशमुख, रवींद्र वाघ, अशोक वानखेडे यांना संजीवनी दर्पण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या कार्यक्रमास तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष आघाव, ठाणेदार अमरनाथ नागरे, भारत मोरे, अनिल आवटी, अकबर पठाण, डॉ. गजानन उल्हामाले, राजेंद्र पळसकर, डॉ. नकुल फुले, तालुका अध्यक्ष गजानन चनेवार, गजानन नरवाडे, सिद्धेश्वर पवार, दत्ता उमाळे, अब्रारखान मिल्ली यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन हमीद मुल्लाजी यांनी केले, तर आभारप्रदर्शन सुरेंद्रसिंह चव्हाण यांनी मानले.