मेरा बु , ता. चिखली (प्रतिनिधी) : तालुक्यातील भूमिहीन अतिक्रमणधारकांच्या ताब्यात असलेल्या शेतीचे तात्काळ कायम पट्टे मिळण्यासाठी चिखली तहसीलवर समता संघटनेच्या वतीने १९ ऑगस्ट रोजी धडक मोर्चा काढण्यात आला हाेता. या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आम्रपाल वाघमारे यांनी केले होते तर चिखली तहसीलदार अजितकुमार येळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नितीन गवई यांनी मार्गदर्शन करून भुमिहीन अतिक्रमण जमिन मिळविण्याची कार्यपध्दती अतिक्रमण धारकासमोर ठेवून त्यांचे खचलेले मनोबल भरण्याचा प्रयत्न केला.
बऱ्याच वर्षापासून कसत असलेली जमिन च ज्या जमिनीवर अतिक्रमण धारकांचा उदरनिर्वाह चालतो आहे त्या जमिनी शासनाने त्यांच्या नावे तात्काळ करण्यात याव्यात. सन २०११ चा शासन निर्णय रद्द करून १९९१ चा शासन निर्णयाचे नव्याने अंमलबजावणी चालू करून शासनाने जुनी असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढून भुमिहीनांना कायम पट्टे देण्यात यावेत. असे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष- आम्रपाल वाघमारे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. १२ जुलै २०११ चा शासन निर्णय हा भुमिहीनावर व अतिक्रमण धारकांवर कसा अन्याय कारक आहे या संबंधात आपण कशी कायदेशीर लढाई लढलो पाहीजे असा आशयाचा कायदेशीर सल्ला संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक माजी न्यायाधिश डि.व्ही. पवार यांनी मांडले.
जिल्हयातील कोणत्याही अतिक्रमण धारकांवर कायदेशीर लढाई लढण्याची वेळ आल्यास समता संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार अॅड. शेषराव काळे यांनी ही लढाई विनामुल्य लढल्या जाईल, अशी ग्वाही संबोधीत करतांना दिली आहे. सदर मोर्चाला संघटेनेचे राज्य सचिव लक्ष्मण शेजोळ, जिल्हाध्यक्ष अरुण भालेराव, घाटावरील जिल्हाध्यक्ष विजय दोडे, तालुका अध्यक्ष – भारत पैठणे, उपाध्यक्ष विष्णू निकाळजे, तालुका सचिव रवि गायकवाड इत्यादी संघटनेचे पदाधिकारी हजर होते. सदर मोर्चा यशस्वी करण्यासाठी शहर प्रमुख राहूल गवई, संदेश मोरे व त्यांचे सर्व सहकारी यांनी परीश्रम घेवून मोर्चा यशस्वी करण्यात आला .