-१ फेब्रुवारी रोजी चेंबूर येथे खुले अधिवेशन; राज्यभरातून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती अपेक्षित
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे ५३वे राज्यस्तरीय खुले अधिवेशन व चर्चा सत्र रविवार, दिनांक १ फेब्रुवारी रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मैदान, टिळक नगर, चेंबूर (मुंबई) येथे मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. या अधिवेशनात शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा होऊन ठराव मंजूर करण्यात येणार आहेत.
या राज्यस्तरीय अधिवेशनास महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये आमदार सुधाकर आडबाले, पदवीधर आमदार धीरज लिंगाडे, आमदार किरणराव सरनाईक, आमदार विक्रम काळे, आमदार सुधीर तांबे, आमदार कपिल पाटील, आमदार जयंत आसावकर, आमदार अरुण लाड, आमदार बाळाराम पाटील, आमदार अभिजीत वंजारी आदींचा समावेश आहे. अधिवेशनास संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल माने, सहकार्यवाह शिवाजी खांडेकर, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, अमरावती विभागीय कार्यवाह डॉ. विजय टाले तसेच राज्यभरातील संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
हे अधिवेशन एकदिवसीय असून, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत शिक्षणाधिकारी (माध्यमिक), बुलढाणा यांच्या पत्र क्र. बुजिप/शिमा/शाळा-4क/270/2026, दिनांक २२ जानेवारी २०२६ नुसार उपस्थितीचे नियोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन बुलढाणा जिल्हाध्यक्ष राजेंद्र घुबे, जिल्हा कार्यवाह शिवाजी बाहेकर, कार्याध्यक्ष सतीश कुलकर्णी, उपाध्यक्ष विनायक भालेराव, शैलेंद्र महाजन, कु. रेखाताई ठाकरे, कोषाध्यक्ष नारायण काकड, मो. रिजवान मो. जाफर, शंकरराव भटकर, बसवेश्वर आखाडे, अविनाश धुमाळे, असलम अंजुम, मो. बशीर, रामेश्वर मोरे, गजानन गरुड, श्रीकृष्ण सावळे तसेच जिल्हा व तालुका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.