– सोमवारी सकाळी ९ वाजता रक्षाविसर्जन
सिंदखेडराजा – तालुक्यातील किनगावराजा येथील दगडाबाई विठोबा मुंढे (वय ७५) यांचे दिनांक ३१ ऑक्टोबररोजी रात्री १० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्व. मुंढे या मनमिळाऊ, साध्या आणि कर्तव्यदक्ष स्वभावामुळे परिसरात लोकप्रिय होत्या. त्यांच्या जाण्याने मुंढे कुटुंबासह नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा अंत्यविधी आज दिनांक १ नोव्हेंबररोजी सकाळी १० वाजता किनगावराजा स्मशानभूमीत पार पडला, तर रक्षा विसर्जन सोमवारी, दि. ३ नोव्हेंबररोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आले आहे. या वेळी नातेवाईक, मित्रमंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या पश्त्यात सुभाष विठोबा मुंढे, सुखदेव विठोबा मुंढे ही मुले, सिंधूबाई कारभारी ढाकणे, राधाबाई गोडीराम ढाकणे, नंदुबाई शिवाजी नागरे, शारदाबाई सर्जेराव दराडे या मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.