Aalandi

वीरपत्नी श्रीमती उषाताई शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त हुतात्मा आर्मी अधिकारी श्रीहरी शिंदे यांच्या वीर पत्नी श्रीमती उषाताई शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा रविवारी ( दि.१४) उत्साहात झाला.
अभिनव एज्युकेशन सोसायटी संचलित सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल आळंदी येथील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त ध्वजारोहनचा कार्यक्रम वीर पत्नी उषाताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास अभिनव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणेश गरुड, संचालक बाबाजी काळे उपस्थित होते. संचालक बाबाजी काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  याप्रसंगी हुतात्मा आर्मी अधिकारी श्रीहरी शिंदे यांच्या कार्याबद्दल देश सेवेची विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी हुतात्मा श्रीहरी शिंदे यांच्या वीरपत्नी उषा शिंदे यांना अभिनव एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षिका व विद्यार्थी या सर्वांनी सलामी दिली. यावेळी शिंदे यांनी मुलांशी सुसंवाद साधत मार्गदर्शन केले.

संस्थेचे अध्यक्ष गणेश गरुड यांनी हुतात्मा आर्मी अधिकारी श्रीहरी शिंदे व भारतीय जवान व त्यांचे कुटुंबीय याचे बद्दल आदर व्यक्त करीत मार्गदर्शन केले. भारतीयांचा अभिमान असलेला तिरंगा ध्वज या बाबतची अमृत महोत्सवा निमित्त मुलांना माहिती देत संवाद साधला. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियांका लांडे, अर्चना शेळके, सुचिता यादव, सोनाली शेळके, अश्विनी पवार, पूजा कोरे, सुरेखा लोटके, लक्ष्मी , पुनम जगताप यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन चैताली महाजन यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!