Breaking newsMaharashtraPolitics

शिंदे सरकारचे खाते वाटप जाहीर

– विखेंकडे महसूल, मुनगंटीवारांकडे वन, तर चंद्रकांतदादांकडे उच्च व तंत्र शिक्षण
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) : राज्यातील मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर झाले असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गृह तसेच अर्थमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडील महत्त्वाची खाती ही देवेंद्र फडणवीसांकडे आली आहेत. मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन तसेच नगरविकास खाते आहे. राज्यात महत्त्वाचे मानले जाणारे गृहमंत्रिपद आणि अर्थमंत्रिपद ही दोन खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. नगरविकास खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:कडे ठेवले आहे.
या खाते वाटपानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग राहणार आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वन खाते देण्यात आले आहे. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण हे खातं देण्यात आले आहे.

  • खाते वाटप पुढील प्रमाणे –
    राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
    सुधीर मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
    चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
    डॉ. विजयकुमार गावित – आदिवासी विकास
    गिरीष महाजन – ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
    गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता
    दादा भुसे – बंदरे व खनिकर्म
    संजय राठोड – अन्न व औषध प्रशासन
    सुरेश खाडे – कामगार
    संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
    उदय सामंत – उद्योग
    प्रा.तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
    रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
    अब्दुल सत्तार – कृषी
    दीपक केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा
    अतुल सावे – सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
    शंभूराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क
    मंगलप्रभात लोढा – पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास
    ——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!