Marathwada

अंतरवाली खांडी ग्रामपंचायत,  जिल्हा परिषद शाळा व अशोक विद्यालयाच्यावतीने ‘हर घर तिरंगा’ रॅलीने गावात जनजागृती

पैठण (तालुका प्रतिनिधी) –  प्रजासत्ताक भारत देशाला 75 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे भारताचा अमृत महोत्सव देशभर साजरा होत आहे . या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार घर घर तिरंगा हर घर तिरंगा ही देशव्यापी मोहीम राबवली जात आहे. या माेहिमेंतर्गत खांडी आंतरवाडी ग्रामपंचायत व अशोक विद्यालयाच्यावतीने गावात जनजागृती रॅली काढण्यात आली .  दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे.  त्याची पूर्व सूचना सरपंच शशिकला रामनाथ डिगोळे व समाजसेवक रामनाथ डिघुळे यांनी शाळेतील प्राध्यापक यांची भेट घेऊन शाळेमध्ये व गावच्या वतीने गावात या रॅलीचे आयोजन करून ग्रामस्थांना दिली.

या रॅलीमध्ये शाळेतील विद्यार्थी तसेच गावातील नागरिक सहभागी झाले होते.  गावात स्वतंत्र्य दिनाच्या अगोदर तीन दिवस विद्यार्थी व गावातील नागरिक हे फेऱ्या काढून जनजागृती करणे व लोकांमध्ये देशभक्ती जागृत करणे यासाठी गावात आज दिनांक 11 ऑगस्ट 22 रोजी ग्रामपंचायत अंतरवाडी खांडी व जिल्हा परिषद शाळा व अशोक विद्यालयाच्या वतीने संयुक्त विद्यार्थ्यांची फेरी काढून देशभक्तीवर फलक दर्शवत घोषणा देण्यात आल्या.  व गावातील मारुती मंदिरासमोर सामूहिक राष्ट्रगीत घेऊन सर्व शिक्षक,शिक्षकेतर, गावातील नागरिक 15 ऑगस्ट च्या कार्यक्रमाची माहिती दिली . यावेळी उपस्थित अंतरवाली खांडी गावचे सरपंच श्रीमती सरपंच सौ शशिकला रामनाथ डिघुळे, समाजसेवक रामनाथ डिघुळे,उपसरपंच नवनाथ कळमकर ,ग्रामसेवक पोकले साहेब ग्रा पं सदस्य सौ.गिता विघ्ने, अनिता ताठे ,मंगल डिघुळे, राधा घुगे, दादा पाटील घुगे ,मिठू म्हस्के, तेजेश्वर वाहुळे पोलीस पाटील सुनीता डिघुळे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव पा. हांडे शालेय समितीचे अध्यक्ष प्रभाकर ढाकणे शालेय समितीचे सदस्य गजानन डिघुळे बाळु घुले लखन डिघुळे जि. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक वाडेकर सर, शिक्षक खिल्लारे सर, जाधव सर, कराड मॅडम, बुरुकुल मॅडम, पोहरे मॅडम, अशोक विद्यालय चे मुख्याध्यापक कदम सर ,शिक्षक विर सर ,वडकर सर ,राठोड सर, गुंजाळ सर ,फुंदे मॅडम, वाघ मॅडम, गीते सर ,माळी सर ,शरद सर, अंगणवाडी सेविका भागीरथी डिघुळे, प्रयागाबाई डिघुळे ,सोनाली डिघुळे, ग्रा.पं.चे कर्मचारी रामनाथ डिघुळे संभाजी डोईफोडे, बप्पासाहेब डिघुळे, रवींद्र वीर, जयराम वाल्हुरे ,शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!