भोकर (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सबंध देशात ‘ हर घर तिरंगा – घर घर तिरंगा ‘ हा राष्ट्रीय उपक्रम दि . १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविला जात असून, या उपक्रमात अनेक सेवाभावी व संस्था लोक सहभाग देत आहेत . याच अनुषंगाने भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून दि . ९ ऑगस्ट रोजी भोकर तालुक्यातील झिंगारवाडी आणि सिताराम नाईक तांडा येथे ‘ हर घर तिरंगा ‘ वाटप करुन या राष्ट्रीय उपक्रमात सहभाग नोंदविला आहे .
भारतीय स्वातंत्र्यासाठी असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान व योगदान दिले आहे . त्यांच्या बलिदान व योगदानाचे स्मरण व्हावे आणि आपल्या देशाप्रती राष्ट्रप्रेम , एकता दर्शविता यावी या उदात्त हेतून भारतीय स्वातंत्र्याच्या ( ७५ वर्ष ) अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सबंध देशात केंद्र व राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावून मानवंदना द्यावी, यासाठी दि .१३ ते १५ ऑगस्ट – २०२२ रोजी दरम्यान ‘ हर घर तिरंगा – घर घर तिरंगा ‘ हा राष्ट्रीय उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम स्वयंस्फुर्तीने प्रत्येक नागरिकाने स्वतः तिरंगा खरेदी करुन व लोकसहभागातून राबवावा असे आहे. हा उपक्रम देशप्रेम भावनेतून साजरा करावयाचा असला तरी दुर्गम भागातील वाडी तांड्यावरील अनेक गरिब व होतकरु नागरिक शहरात येऊन नाव नोंदणी करुन तिरंगा ध्वज खरेदी करु शकत नाहीत . अशा नागरिकांना ही या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी करुन घेता यावे यासाठी अनेक सेवाभावी व्यक्तीमत्वे व संस्था स्वयंस्फुर्तीने सहभागी होऊन त्यांना तिरंगा ध्वज देत आहेत . शासन प्रशासनाने तसे आवाहन ही केले आहे.याच अनुशंगाने भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दि.९ ऑगस्ट २०२२ रोजी भोकर तालुक्यातील आदिवासी बहुलवसती झिंगारवाडी व सिताराम नाईक तांडा येथील नागरिकांना तिरंगा ध्वजांचे वाटप करण्यात येऊन ‘ हर घर तिरंगा ’ हा राष्ट्रीय उपक्रम राबविण्यात आला ., क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त भोकर तालुक्यातील झिंगारवाडी व सिताराम नाईक तांडा येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले आणि जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला . यानंतर भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे , कार्याध्यक्ष शेख लतिफ भाई , उपाध्यक्ष सिद्धार्थ जाधव , सचिव बालाजी नार्लेवाड , कोषाध्यक्ष गंगाधर पडवळे , अन्य पदाधिकारी कमलाकर बरकमकर , बालाजी कदम पाटील , विठ्ठल सुरलेकर , मो.सुजावोद्दीन , विशाल जाधव , गजानन गाडेकर , बोईवार यांसह आदींच्या हस्ते दोन्ही गावच्या नागरिकांना तिरंगा ध्वजांचे वाटप करण्यात आले . तसेच दि .१३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हे तिरंगा ध्वज सन्मान पुर्वक , सुरक्षित ठिकाणी व ध्वज संहितेचे पालन करुन हा राष्ट्रीय उपक्रम राबवावा असे आवाहन यावेळी पत्रकार संघाचे वतीने करण्यात आले . तर हा उपक्रम झिंगारवाडी येथे यशस्वी करण्यासाठी सरपंच प्रतिनिधी विनोदचव्हाण , ग्रामसेविका माधवी जाधव , तलाठी दीपिका गोजे , शिक्षक वंगाले , भंडरवाड , ग्रा.पं.सदस्य सुनील चव्हाण , कोतवाल दत्तराम चंचलवाड , अंगणवाडी सेविका विमलबाई भिसे यांनी आणि सिताराम नाईक तांडा येथील सरपंच सुशिलाबाई चव्हाण , माजी सरपंच जीवन नाईक चव्हाण , स्वस्त धान्य दुकानदार मधूकर चव्हाण , साहेबराव राठोड , आंगणवाडी सेविका देवकाबाई चव्हाण यांसह आदींनी परिश्रम घेतले . यावेळी जेष्ठ नागरिक धुरपतबाई चंपती भिसे , लिंबाजी गणपती झिंगरे , शोभाबाई संतोष झिंगरे , मारोती खुपसे , पुष्पा कामाजी भिसे याच बरोबर सिताराम नाईक तांडा येथील धर्मिबाई चव्हाण , दरुबाई राठोड , स्वस्त धान्य दुकानदार मधुकर चव्हाण , गोवर्धन चव्हाण , साहेबराव राठोड , राजेश राठोड , सुनिल चव्हाण यांसह आदी नागरिकांची उपस्थिती होती . दोन्ही ठिकाणी सुत्रसंचालन बालाजी नार्लेवाड यांनी केले.तर उपस्थितांचे आभार गंगाधर पडवळे यांनी मानले .