Breaking newsHead linesMaharashtra

बुलडाणा, सोलापूर, नांदेडमध्ये पालकमंत्र्यांविना ध्वजारोहण; जिल्हाधिकार्‍यांवर जबाबदारी!

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने पालकमंत्र्यांची घोषणा केली नसल्यामुळे स्वातंत्र्य दिनाला जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून राज्य सरकारने ३५ जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण कोण करेल, याची अधिकृत घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या ३५ जिल्ह्यांपैकी १९ जिल्ह्यांमध्ये शपथ घेतलेले मंत्री १५ ऑगस्टला ध्वजारोहण करतील, याशिवाय उरलेल्या जिल्ह्यांमध्ये तिथले जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत. त्यामुळे अकोला, बुलडाणा, वाशिम, नांदेड जिल्ह्यांत जिल्हाधिकारी हेच ध्वजारोहण करणार आहेत. बुलडाणा जिल्ह्याला मंत्रिपद मिळेल, अशी आशा होती. परंतु, ती फेल गेल्याने पालकमंत्र्यांविना बुलडाणा येथे ध्वजारोहण होणार आहे.
मुख्यमंत्र्यांसह सध्या २० मंत्री असल्याने प्रत्येकाला जिल्हानिहाय झेंडावंदनाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. तर इतर सोळा जिल्ह्यांत विभागीय आयुक्त किंवा संबंधित जिल्हाधिकारी यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांकडे नागपूर, चंद्रकांत पाटलांकडे पुण्यात ध्वजारोहणाची जबाबदारी आहे. तर अमरावती येथे विभागीय आयुक्त, कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशिम, बुलडाणा, पालघर, नांदेड या ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत. त्यामुळे जे मंत्री ज्या जिल्ह्यात ध्वजारोहण करतील तेच त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • – कोण कुठे ध्वजारोहण करणार-
    १) नागपूर – देवेंद्र फडणवीस
    २) पुणे – चंद्रकांत पाटील
    ३) चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार
    ४) अहमदनगर – राधाकृष्ण विखे-पाटील
    ५) नाशिक – गिरीश महाजन
    ६) धुळे – दादा भुसे
    ७) जळगाव – गुलाबराव पाटील
    ८) ठाणे – रविंद्र चव्हाण
    ९) मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा
    १०) सिंधुदुर्ग – दीपक केसरकर
    ११) रत्नागिरी – उदय सामंत
    १२) परभणी- अतुल सावे
    १३) औरंगाबाद – संदीपान भुमरे
    १४) सांगली – सुरेश खाडे
    १५) नंदुरबार – विजयकुमार गावित
    १६) उस्मानाबाद – तानाजी सावंत
    १७) सातारा – शंभुराज देसाई
    १८) अब्दुल सत्तार – जालना
    १९) यवतमाळ – संजय राठोड
    —————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!