– जनतेच्या करातून आलेल्या सत्ताधार्यांचे कपडे आता जनताच फाडेल : राहुल बोंद्रे
चिखली/देऊळगावराजा (राजेश लोखंडे/ राजेंद्र डोईफोडे) – शेतकर्यांच्या अंगावरचे कपडे आणि पायातली चप्पल आमच्या सरकारची आहे, लाडक्या बहिणींना पगार सरकार देते, अशा प्रकारचे विधान करुन भाजपचे माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकरांनी राज्यातील शेतकरी व लाडक्या बहिणींची औकात काढली होती. मात्र सत्ताधार्यांच्या अंगावरील कपडे, बूट, आमदारकी, गाडीतील डिझेल, विमानाचे तिकीट, नेतेगिरी ही जनतेमुळेच आहे. कारण जनतेने भरलेल्या करातूनच सरकार चालते. जनतेच्या करातून आलेल्या सत्ताधार्यांचे कपडे आता जनताच फाडेल. तसेच यापुढेही भाजपच्या नेत्यांची अशाच प्रकारची बेताल वक्तव्ये सुरु राहिली तर जनता यांना खरोखर जोडे मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजपला दिला. सोमवारी (दि.३०) काँग्रेसच्यावतीने भाजपचे बेताल वक्तव्य करणारे आ. बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला चिखली व देऊळगावराजा येथे जोडे मारण्यात आले. चिखली येथील आंदोलनावेळी राहुल बोंद्रे बोलत होते.
सोमवार दि. ३० जून रोजी चिखली येथे तालुका काँग्रेसच्यावतीने भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तद्नंतर चिखली तहसीलदार यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले. लोणीकर यांच्या अत्याचारी व अपमानकारक वक्तव्याची सखोल चौकशी करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी, त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्यात यावी, भविष्यात कोणताही लोकप्रतिनिधी सामान्य जनतेविषयी अपमानास्पद भाषा वापरणार नाही, यासाठी कठोर कायदा करावा. अन्यथा चिखली काँग्रेसच्यावतीने यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष रामभाऊ जाधव, शहर अध्यक्ष राहुल सवडतकर, माजी अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, डॉ. मोहमंद इसरार, कुणाल बोंद्रे, सचिन बोंद्रे, प्रा.राजु गवई सर, प्रा. निलेश गांवडे सर, युवक कॉंग्रेसचे विकास लहाने, रिक्की काकडे, डॉ. सत्येंद्र भुसारी, ज्ञानेश्वर सुरूशे, किशोर कदम, शहेजादअली खान, पांडुरंग पाटील भुतेकर, जय बोंद्रे, सेवालदचे रामेश्वर भुसारी, विजु पाटील शेजोळ, ईश्वरराव इंगळे, शिवराज पाटील, डॉ. अमोल लहाने, सरपंच मनोज लाहुडकर, डॉ. संजय घुगे, मनोज जाधव, सतिष शिंदे, अमिनसेठ, सचिन शेटे, शिवनारायण म्हस्के, राजु रज्जाक, दिपक थोरात, विलास कंटुले, बंडु कुळकर्णी, बिदुसिंग इंगळे, रोहन पाटील, रमजान चैधरी, खलील बागवान, विजय जागृत, प्रकाश सपकाळ, आरिफ बागवान, भास्कर चांदोरे, मोहित घुगे, शेषराव आंभोरे, अशोक झगरे, दत्तात्रय करवंदे, जिवनबापु देशमुख, समाधान आकाळ, पवन सपकाळ, दिलीप पाटील, रोहन करंडे, शेख मजिद,शेख अजिम, अच्युतराव पाटील, मनोहर म्हळसने, व्यंकटेश रिंढे, जाकीर शेख, सदुनाना ठेंग, दिलीप चवरे, शिवाजी म्हस्के, प्रकाश राठोड, तात्या करंडे, शकीलभाई, शेख अजिम, विठ्ठल शेळके, अब्दुल अजिस, राहुल हिवाळे, राहुल चैथे, विजय येवले, प्रकाश कुटे, मोतीराम शेजोळ, उमाकांत सेठ, प्रसाद डुकरे, सागर वायाळ, विजय सोनवाल, प्रविण वानखेडे, दयाळु राठोड, उकर्डा राठोड, इलियास शेख, विकी पवार, मुकींदा खरात, चेतन गायकवाड, सागर वांजोळ, विजु पाटील यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
देऊळगावराजा येथे काँग्रेसच्यावतीने भाजप आ.बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन
देऊळगावराजा – जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या निर्देशानुसार, भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकरी, कष्टकर्यांसंबंधात जे बेताल वक्तव्य केले, त्याचा निषेध म्हणून, काँग्रेस पक्षाच्यावतीने सोमवारी सकाळी ११.०० वाजता बस स्टँड चौक देऊळगावराजा येथे भाजप आमदार लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन केले. शेतकरी कष्टकरी विरोधी आमदारावर योग्य ती कार्यवाही करण्यासंबंधातील निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत राज्यपाल यांना देण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे तसेच महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते. तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रामदास डोईफोडे, शहर अध्यक्ष अतिश कासारे, जेष्ठ नेते रमेश कायंदे, अनिल सावजी, हनीफ शहा, गंगाधर जाधव, गोविंदराव झोरे, राजेश इंगळे, अनिल शिवरकर, गणेश सवडे, बाळुभाऊ शिंगणे, हरीश शेटे, रामेश्वर वायाळ, प्रकाश राजे, नासेर भाई, रामू खांडेभराड, प्रा अशोक डोईफोडे, मुन्ना ठाकूर, इस्माईल बागवान , मुबारक खान, यश कासारे, इरफान पठाण तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.